shegaon murder case warora taluka details
shegaon murder case warora taluka details : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यामधील शेगाव येथे १९ जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान मुलाने वडिलांची कुऱ्हाडीने वार करीत हत्या केली, शेगाव पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. son murders father with axe
शेगाव मधील विठ्ठल मंदिर वार्डात राहणारे ५८ वर्षीय गुलाब पत्रुजी दातारकर व त्यांचा मुलगा ३४ वर्षीय अभय दातारकर यांच्यामध्ये सकाळी कडाक्याचे भांडण झाले, त्यानंतर वडील हे घरी बसून असताना मुलगा अभय ने कुऱ्हाडीने वडिलांच्या डोक्यावर व तोंडावर सपासप वार केले, या हल्ल्यात वडील गुलाब दातारकर हे जागीच ठार झाले. सदर हत्या हि शेतीच्या वादातून झाली अशी माहिती आहे.
आरोपी मुलाला अटक
घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली, नागरिकांनी यावेळी एकच गर्दी केली होती, शेगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली असता पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व आरोपी अभय दातारकर ला अटक करण्यात आली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय सुमित कांबळे,ए एस आय दिनकर घोटेकर,मदन येरणे,निखिल कौरासे, छगन जांभुळे,दिनेश ताटेवार,पोलीस शिपाई संतोष निषाद,प्रशांत गिरडकर,प्रगती भगत करीत आहे.
