sudden electric shock while drying clothes
sudden electric shock while drying clothes : राजुरा – मृत्यू हा कधी आणि केव्हाही येऊ शकतो, त्यासाठी एक निमित्त पुरे आहे, अधिक हृदयद्रावक घटना राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) गावात घडली. घरातील कामे आटोपते करीत असताना महिलेला विजेचा जोरदार धक्का बसला, या धक्क्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.
चंद्रपुरात गांजा विक्री करणाऱ्या महिलांना अटक
४० वर्षीय सुवर्णा राजेश वांढरे असे त्या मृत महिलेचे नाव असून घरासमोरील अंगणात कपडे वाळू लावायला बाहेर आलेल्या सुवर्णा यांनी कपडे वाळविण्यासाठी अंगणातील लोखंडी तारांवर कपडे ठेवत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. हि घटना २० जुलै रोजी रविवारी सकाळच्या सुमारास घडली.
सर्व्हिस केबलमुळे विजेचा प्रवाह
विशेष बाब म्हणजे त्या तारेला कटलेली विजेची सर्व्हिस केबल लागली होती त्यामुळे त्या तारांमध्ये विजेचा प्रवाह सुरु होता, याची कल्पना सुर्वणा यांना नव्हती नेहमीप्रमाणे त्या आपलं काम करीत होत्या मात्र आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल असे कुणालाही वाटलं नसेल.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून वांढरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
