12 year old boy drowned in Sindewahi । सिंदेवाहीत काळजाला हादरवणारी घटना, खेळता खेळता गेला खोल पाण्यात…

12 year old boy drowned in Sindewahi

12 year old boy drowned in Sindewahi : सिंदेवाही: सिंदेवाही तालुक्यातील खातगाव गावावर आज शोककळा पसरली आहे. गावात राहणारा १२ वर्षीय लोकेश उर्फ समीर मोहन वरखडवार याचा नदीच्या खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. लोकेश सहावी इयत्तेत शिकत होता.

अम्मा चौक वाद, काय म्हणाले आमदार जोरगेवार

कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईसोबत घडली दुर्दैवी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश दररोजप्रमाणे आपल्या आईसोबत गावाजवळील नदीवर कपडे धुण्यासाठी गेला होता. आई कपडे धुण्यात व्यस्त असताना लोकेश नदीच्या उथळ पाण्यात खेळत होता. खेळता खेळता तो अचानक खोल पाण्यात गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला.

आईच्या डोळ्यासमोरच ही दुर्दैवी घटना घडली. आपल्या मुलाला बुडताना पाहून आईने मदतीसाठी आरडाओरडा केला, परंतु काही क्षणातच लोकेश खोल पाण्यात बेपत्ता झाला. या घटनेमुळे आईवर मोठा मानसिक आघात झाला असून, तिची अवस्था पाहून गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. mother witness drowning tragedy

गावात शोककळा आणि हळहळ व्यक्त

लोकेशच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. लोकेश हा मनमिळावू आणि हुशार मुलगा होता. त्याच्या अचानक जाण्याने वरखडवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावातील लोक कुटुंबाला धीर देत आहेत.

Leave a Comment