Chandrapur Babupeth illegal liquor raid
Chandrapur Babupeth illegal liquor raid : चंद्रपूर – शहरातील बाबुपेठ भागात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू विकल्या जाते याबाबत आम आदमी पक्षाने प्रकरण उचलत संबंधित विभागाला कारवाईचे करण्यासंबंधीचे पत्र दिले होते. याबाबत चंद्रपूर पोलिसांनी बाबुपेठ भागात अवैध दारू व्यवसायिकांविरुद्ध कारवाई सत्र राबविले, या कारवाईत देशी दारू सहित ४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी ६ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
६ आरोपींवर गुन्हा दाखल
घरी देशी दारू साठवीत बेकायदेशीरपणे विक्री चा व्यवसाय करणारे बाबुपेठ मधील ३५ वर्षीय युवराज कैलास झाडे यांच्या घरी धाड मारली असता देशी दारूच्या २४ बॉटल, ५५ वर्षीय रजनी राजेंद्र साटोणे यांच्याजवळून १६ देशी दारूच्या बॉटल, ८९ वर्षीय सईबाई गोपाळ मैथि १६ बॉटल, ५५ वर्षीय संगीता देविदास गेडाम १२ बॉटल, ५५ वर्षीय भीमराव प्रभाकर माऊलीकर जवळून २० बॉटल व ४० वर्षीय राहुल अशोक देवगडे जवळून १४ बॉटल असा एकूण ४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल चंद्रपूर शहर पोलिसांनी जप्त केला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, सपोनि सहारे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, कपिल घुगे, वैभव चव्हाण, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, तनुजा गजभे, सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, इम्रान शेख, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, राकेश फुकट, कपूरचंदं खरवार, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, मोरेश्वर शिंदे, सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.
