Chimur Chandrapur bus accident । एक क्षण… आणि बस रस्त्याखाली! स्टेअरिंग लॉक आणि…चिमूर-चंद्रपूर बसचा भीषण अपघात

Chimur Chandrapur bus accident

Chimur Chandrapur bus accident : वरोडा – चिमूरहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला आज दुपारी भीषण अपघात झाला. चारगाव खुर्द जवळील एका वळणावर ही बस रस्त्याच्या खाली घसरली. या अपघातात बसचा वाहक सुरेश भटारकर (रा. राजुरा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, बसमधील चालक आणि इतर 19 प्रवासी जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वरोरा नाका चौकाचे होणार नामांतर

अपघाताचे कारण काय?

आज, मंगळवार (5 ऑगस्ट) रोजी दुपारी दोन वाजता चिमूर आगाराची बस क्र. एम एच ४० ए क्यू ६१८१ चिमूरवरून चंद्रपूरच्या दिशेने जात होती. चंद्रपूर-वरोडा राष्ट्रीय महामार्गावर चारगाव खुर्द गावाजवळ एका वळणावर समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रॅव्हल्समुळे बसचालक सुनील सुधाकर कुसनाके (वय ३७, रा. वरोडा) यांचे बसवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने बसचे स्टेरिंग लॉक झाले आणि बस रस्त्याच्या खाली घसरली. Maharashtra state transport bus accident

जखमी प्रवाशांवर उपचार सुरू

अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 25 प्रवासी होते. यापैकी सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींमध्ये शकील शेख (आडेगाव), शाहीन शेख (गडचांदूर), वासुदेव शेडमाके (वायगाव भोयर), वसंता देठे (बल्लारशा), ईश्वर चिंचोळकर (धामणी) आणि संजय कोवे (घुग्गुस) यांचा समावेश आहे.

इतर जखमी प्रवाशांवर वरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींमध्ये रेखा श्रीरामे (चंद्रपूर), सुमन बालूदे (लोधीखेडा), कांताबाई नवले (भिसी), शामकला दडमल (सुमठाणा), भरत चिंचोळकर (चिमूर), वनिता दडमल (चिमूर), मधुकर चिंचोलकर (चिमूर), मालती कापसे (चिमूर), सोमाबाई चिंचोलकर (धामणी), स्नेहा वाजुरकर (इंदिरानगर चंद्रपूर) आणि सदाशिव मून (बल्लारशा) यांचा समावेश आहे.

IMG 20250724 WA0003

अपघाताची माहिती मिळताच राज्य परिवहन मंडळाचे वरोडा आगार प्रमुख वर्धेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. बसचालकाने स्वतः शेगाव पोलीस ठाण्यात जाऊन अपघाताची माहिती दिली. शेगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!