monuments for Gond heroes in Chandrapur
monuments for Gond heroes in Chandrapur : चंद्रपूर (२५ ऑगस्ट २०२५) – जिल्ह्यातील आदिवासींच्या मागण्यांवर जिल्हा प्रशासन गंभीर नाही. त्यामुळे आदिवासी प्रशासनावर प्रचंड संतापले आहेत. जर प्रशासनाने या समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाहीत तर आदिवासी संघटनांना रस्त्यावर उतरून जनआंदोलन सुरू करावे लागेल असे संकेत गोंडवाना गणतंत्र पक्षाचे नामदेव शेडमाके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा प्रशासनाला दिले.
अस्वलाच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
त्यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्याला गोंडराजाचा इतिहास आहे. ज्या महापुरुषांनी आपले बलिदान दिले त्यांच्या आदर्शांना आणि बलिदानांना लक्षात ठेवून गिरनार चौकात क्रांतिकारी शहीद बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांचे स्मारक आणि पुतळा उभारावा आणि चौकाला बाबुराव शेडमाके चौक असे नाव द्यावे, जटपुरा गेटजवळ राजमाता राणी हिराई यांचे स्मारक आणि पुतळा उभारावा आणि राणी हिराई चौक असे नाव द्यावे,
गोंडराज यादवशाह महाराज आत्राम यांचे स्मारक
चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटचे गोंडराज यादवशाह महाराज आत्राम यांचे स्मारक आणि पुतळा चंद्रपूरच्या बसस्थानक परिसरात बसवावे आणि चौकाला त्यांचे नाव द्यावे, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर आणि लगतच्या परिसरातील शेतकयांच्या शेतजमिनी संपादित करून शेतकयांना योग्य मोबदला द्यावा, सिमेंट कंपनीचे व्यवस्थापक जबरदस्तीने खोदकाम करत आहेत आणि ते त्वरित थांबवण्याची मागणी नामदेव शेडमाके यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेत बापूजी मडावी, नामदेव शेडमाके, जितू मडावी, राजेंद्र धुर्वे, राजेंद्र मेरस्कोल्हे उपस्थित होते.
