Rishi August ITI Chandrapur job fair
Rishi August ITI Chandrapur job fair : चंद्रपूर, दि. 8 : ऋषी अगस्त शासकीय औ्द्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा सर्व व्यवसायाच्या आजी व माजी आयटीआय पास व शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता असून जिल्ह्यातील जी.एम. आर. इन्फ्रा, साई वर्धा पॉवर, मल्टी ऑरगॅनिक, मल्टी व्ह्यू फायबर, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर तसेच इतर नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी येणार आहे. PM Apprenticeship Mela Chandrapur 2025
चंद्रपुरातील एमडीआर मॉल मध्ये बांबू वस्तू विक्री स्टॉल सुरु
प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी योजना ही केंद्र शासन पुरस्कृत असून कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे. या व्दारे औद्योगिक आस्थापनेत आपले कौशल्य विकसित करून आत्मनिर्भर होण्यांची व रोजगाराची संधी उपलब्ध होते.
विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
सदर योजनेमुळे प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराचे धडे मिळतात. प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळाव्याअंतर्गत विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून सदर संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयटीआयचे प्राचार्य वैभव बोंगिरवार तसेच बीटीआरआय कार्यालयाच्या सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी केले आहे.

शिकाऊ उमेदवारी करिता निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार कंपनीतर्फे सोयी सुविधा उपलब्ध राहतील. सदर मेळाव्याचे आयोजन ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर तसेच बीटीआरआय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित होत असुन याकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी आयटीआयचे गटनिदेशक श्री. टोंगे व बीटीआरआयचे योगेश धवणे यांच्याशी संपर्क साधावा.
9579265930