Chandrapur BJP internal conflict । चंद्रपूर मनपा निवडणूक 2026 : भाजपच्या गटबाजीमुळे डोकेदुखी वाढणार

Chandrapur BJP internal conflict

Chandrapur BJP internal conflict : चंद्रपूर – २१ सप्टेंबर २०२५ – वर्ष २०२६ मध्ये महानगरपालिका निवडणुका घ्या असे आदेश धडकल्यावर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे, चंद्रपूर भाजपने २० सप्टेंबर रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती कार्यकर्ता सन्मान मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना चंद्रपूर महानगरपालिकेच्या ६६ जागा जिंकण्यासाठी तयारीला लागले असे आदेश दिले. आपल्याला आता जिंकायचं आहे, यासाठी प्रत्येक नागरिकांच्या घरी जा, त्यांच्या भेटीगाठी घ्या असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. मात्र आगामी मनपा निवडणुकीत भाजपला अनेक आव्हानाच्या सामोरे जावे लागणार आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील माजी आमदाराबाबत आक्षेपार्ह पोस्ट

वर्ष २०१७ च्या मनपा निवडणुकीत ६६ जागेपैकी भाजपने ३६ जागा जिंकल्या होत्या, त्यावेळी कांग्रेस १२, शिवसेना २, राष्ट्रवादी कांग्रेस २, बहुजन समाज पार्टी ८, मनसे २, अपक्ष ४ यांनी बाजी मारली त्यावेळी भाजपला बहुमत मिळाले होते. २०२२ नंतर मनपा वर प्रशासकाची नियुक्ती झाल्याने अनेक कामे रखडले होते. आणि विशेष बाब म्हणजे राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात ताटातूट झाल्याने २ शिवसेना व २ राष्ट्रवादी पक्ष अस्तित्वात आले. पक्ष ताटातुटीनंतर मनपाची हि पहिली निवडणूक आहे.

भाजपात गटबाजी

चंद्रपूर शहरातील २८ हजार नागरिकांना पट्टे मिळणार अशी घोषणा महसूलमंत्री बावनकुळे यांनी केली असून बूथ कार्यकर्ता यांना सदर पट्टा वाटप बाबत माहिती द्यावी जेणेकरून आपली सत्ता आल्यास सर्वाना पट्टे वाटप होणार अशी माहिती द्यावी. राज्यात जसे २ पक्षात गट निर्माण झाले त्याप्रकारे चंद्रपुरात भाजपचे २ गट तयार झाले आहे. भाजपचे आमदार मुनगंटीवार व आमदार जोरगेवार हे मनपा निवडणुकीत एकत्र येत निवडणूक लढणार कि वेगवेगळे असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. भावी नगरसेवक सध्या संभ्रमात असून कुणाच्या मागे गेल्याने मनपाची तिकीट मिळेल असा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. त्याकरिता कार्यकर्ते सुद्धा आपले पाऊल जपून टाकत आहे. विशेष बाब म्हणजे भाजपच्या कार्यकर्ता सन्मान मेळाव्यात मुनगंटीवार समर्थकांनी पाठ दाखवली. Chandrapur municipal election 2026

मागील ५ वर्षात आप चर्चेत

भाजप चंद्रपुरात मजबूत स्थिती मध्ये आहे असं शहर नेतृत्वाला वाटत असे तर ते चुकीचे आहे कारण यावेळी भाजपचे २ गट एकमेकांविरुद्ध काम करेल, कांग्रेस पक्ष सुद्धा यावेळी तयारीने उतरणार असून आप यावेळी प्रस्थापित पक्षांना आवाहन देण्याच्या तयारीत आहे. सोबतच उबाठा, राष्ट्रवादी व मनसे यांची स्थिती आजच्या परिस्थितीत कमकुवत आहे. सत्ताधारी पक्षविरोधात फक्त आप पक्षाने अनेक आंदोलने केली आहे.

चंद्रपूर शहराची स्थिती सध्या अत्यंत वाईट आहे, मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे, ३ महिन्यापूर्वी नव्याने निर्माण करण्यात आलेले रस्ते शेवटच्या घटका मोजताना दिसत आहे. चंद्रपूर शहरात नागरिक अनेक समस्याने त्रस्त झाले असून प्रशासन व आमदार मुकदर्शक बनले आहे. येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप समोर तिकीट वाटपाची डोकेदुखी उभी राहणार असून ६६ जागा निवडणून येणार हे स्वप्न भाजप सध्या बघत आहे. Chandrapur BJP internal conflict

विशेष बाब म्हणजे भाजपच्या महानगर कार्यकारणीत ज्यांच्यावर संघटना वाढविण्याची जबाबदारी महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांनी दिली आहे, त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची फळी हि शून्य आहे, पद मिळाल्याने पदाधिकारी सुद्धा फक्त भाजपच्या नावावर संघटना वाढविणार काय? असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment