chandrapur flood latest update |मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

chandrapur flood latest update

chandrapur flood latest update : चंद्रपूर १३ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे, यामुळे वर्धा व इरई नदीचा जलस्तर वाढला असून अनेक ठिकाणी पुराचा धोका वाढला आहे, इरई धरण परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुरात अडकली बस, बसमध्ये होते ७० विद्यार्थी

इरई धरणाचे ७ दरवाजे उघडले

चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने धरणाचे सातही दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठील पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. पुलावरून पाणी जात असल्यास कुणीही पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, जनावरांना नदीकाठी चरण्यास सोडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. flood warning Errai dam villages

जीर्ण इमारत कोसळली, २ मुली बचावल्या

संततधार पावसामुळे बल्लारपूर शहरातील १०० वर्षे जुनी असलेली जीर्ण इमारतीचा मोठा भाग शुक्रवारी रात्री कोसळला, बल्लारपूर वस्ती विभागातील गांधी चौकाच्या नजिक असलेला गुप्ता यांच्या घराचा रस्त्याकडील पूर्ण भाग कोसळला. यावेळी मार्गावरून जात असलेल्या दोन मुली थोडक्यात वाचल्या. मलब्याखाली दबलेली काही दुचाकी वाहने अग्निशमन दलाच्या पथकांनी काढले आहे.अजूनही काही दुचाकी वाहने ढिगाऱ्याखाली दबलेली आहेत.या दुर्घटनेत कोणतीही वित्तहानी वा जिवीतहानी झालेली नाही. 100-year old building collapse in Ballarpur
रस्ता बंद करून बॅरीगेटिंग करण्यात आले.त्या ठिकाणी १ सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले. इमारतीत राहणाऱ्या दोन कुटुंबांपैकी १ कुटुंब त्यांच्या नातेवाईकाकडे थांबले असून १ कुटुंबाची राहण्याची व्यवस्था लोक मंगल कार्यालयात केली आहे. जेसीबी आणि ट्रॅक्टर लावून मलबा काढण्याबाबत सूचन देण्यात आल्या. सदर इमारत खूप जुनी असल्याने अगदी जीर्ण झालेली आहे.

बस पाण्यात

दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी अंदाजे वेळ 18.15 वाजता चंद्रपूर आगाराची बस क्रमांक MH40 N 9426 भादुर्ली ते मुल येत असताना रेल्वेपटरी खालील बोगद्या मध्ये गाडी आली असता अंदाजे एक ते दोन फूट पाणी असल्याने बस निघू शकेल असे समजून चालकाने गाडी काढण्याचा प्रयत्न केला असता सायलेन्सरला पाणी लागल्यामुडे गाडी बंद पडली व पाऊस वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने गाडीच्या रेडिएटर पर्यंत पाणी आले असून गाडी अडकून आहे. सदर गाडीत तीन प्रवासी प्रवास करत होते. सदर प्रवासी व चालक वाहक सुखरूप आहे.
सदर घटना चालकाच्या निष्काळजी पणामुळे घडलेली आहे. घटनास्थळी आगार व्यवस्थापक, चंद्रपूर, विभागीय वाहतूक अधिकारी, सहाय्यक यंत्र अभियंता हे यांत्रिक कर्मचाऱ्यांसाह गाडी काढणायासाठी पोहोचले होते. chandrapur flood latest update

bus in water

३ कामगारांचे रेस्क्यू

आज दिनांक 13सप्टेंबर रोजी अंकुश डिव्हिजन तरफदार वय २८ राह. नरेंद्रपूर तालुका चामुर्शी जिल्हा गडचिरोली 2) आशिष आनंदलाल शहा, वय ३५, राह. लालपेठ चंद्रपूर, 3) शुभजीत शंकर देवनाथ वय ३१, राह. सुभाष ग्राम तालुका चामुर्शी जिल्हा गडचिरोली हे सर्व लॉईड मेटल कंपनीचे लेबर कंपनीचे पाणी पुरवठ्याचे काम करीत असताना म्हातारदेवी गावा जवळील वर्धा नदीला पूर आल्याने दि. 12.09.25 चे रात्री पासून नदीमध्ये अडकून होते. वरील अडकलेल्या लोकांना आज दिनांक 13.09.2025 रोजी चंद्रपूर जिल्हा पोलीस रेस्क्यू पथक मधील बोट चालक – पीएसआय अशोक गर्गेलवार, रेस्क्यू पथक मधील पोलीस हवालदार मनोज हांडे , उमेश बनकर, प्रमोद डोंगरे, गिरीश मरापे, वामन नक्षीने, लीलाधर करमे, राजाराम गायकवाड, सुमेध घडसे यांनी बोटच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले.

rescue

वरोरा : निमसडा मार्ग बंद झालेला आहे. निमसड्याचे 32 शाळेचे विद्यार्थी व 25 ग्रामस्थ अडलेले असून त्यांची व्यवस्था वर्धा पावर कंपनीमध्ये करण्यात आली आहे. वरोरा तालुक्यातील सोईत – कोसारा पुलावर 5 फूट पाणी आल्याने सदरचा मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे. road closure warnings flood

Leave a Comment