Chandrapur property tax online payment । 💰 चंद्रपूरकरांसाठी सुवर्णसंधी! मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा थेट 10% सूट

Chandrapur property tax online payment

Chandrapur property tax online payment : ८ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 2025-26 चालु आर्थिक वर्षातील मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्यांना सवलत दिली जात असुन 30 सप्टेंबर पूर्वी कराचा भरणा केल्यास 8 टक्के सूट देण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने कर भरल्यास अतिरिक्त 2 टक्के म्हणजेच 10 टक्के सूट मनपामार्फत देण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने कर भरणा करण्याकडे नागरिकांचा कल वाढला असुन मागील आर्थिक वर्षात 8914 तर यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत 5036 असे एकूण 13950 नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करण्यास ऑनलाईन प्रणालीचा वापर केला आहे.  

पतीसमोर वाघाने पत्नीला नेले फरफटत, चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

मागील वर्षी म्हणजे सन 2024-25 या आर्थिक वर्षात 8914 मालमत्ता धारकांनी एकूण रु.7 कोटी 49 लक्ष 14 हजार 302 इतक्या रक्कमेचा ऑनलाईन भरणा केला होता तर सन 2025-26 या चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 5036 मालमत्ता धारकांनी एकूण रु.2 कोटी 97 लक्ष 51 हजार 350 इतक्या रक्कमेचा ऑनलाईन भरणा केला आहे.

घरबसल्या कर भरण्याची संधी

शहरातील मालमत्ताधारकांना करांचा भरणा सुलभरीत्या करता यावा म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ऑनलाइन युपीआय ॲप अर्थात फोन पे, गुगल पे,भीम ॲप ( भारत इंटरफेस फॉर मनी ) या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.आता मालमत्ता कर भरणे आता अधिक सोपे झाले असुन, नागरीक chandrapurmc.org या लिंकसोबतच युपीआय ॲपचा वापर करून मोबाईलद्वारे सुद्धा कर भरू शकतात. Chandrapur Municipal Corporation property tax

शहरात 80 हजारांपेक्षा अधिक मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या कराची रक्कम रोखीने अथवा धनादेशाद्वारे अदा करण्याची पद्धत आहे. यात महापालिका कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली करीत असतात किंवा संबंधित मालमत्ताधारक पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये जाऊन रकमेचा भरणा करीत असतात. मात्र अनेकदा वेळेच्या अभावामुळे अथवा कार्यालयातील गर्दीमुळे प्रत्यक्ष रोखीने अथवा धनादेशाद्वारे कर भरण्यास अडचण निर्माण होते. अशा वेळी नागरिकांना करभरणा करताना सोयीचे व्हावे म्हणून युपीआय ॲपशी कर प्रणाली लिंक करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले होते. how to pay property tax online

मालमत्ता करावरील ही सूट 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच देण्यात येत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा करून या अतिरिक्त सूटचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  

Leave a Comment