Construction worker death by electric shock | मूल तालुक्यात भीषण अपघात – दोन बांधकाम मजुरांचा करंट लागून मृत्यू ⚡

Construction worker death by electric shock

Construction worker death by electric shock : चंद्रपूर १७ सप्टेंबर २०२५ – मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथे बुधवारी (दि. १७) सकाळी घडलेल्या भीषण घटनेत दोन बांधकाम मजुरांचा करंट लागून मृत्यू झाला. या अपघातामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून, महावितरणच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याची चर्चा सर्वत्र आहे.

चंद्रपुरात क्लोरीन गॅस गळती, मोठी दुर्घटना टळली

दिलीप पांडुरंग गिरडकर यांच्या घराचे बांधकाम सुरू असून, या कामासाठी नवेगाव भु. येथील बांधकाम मिस्त्री व मजूर कार्यरत होते. सकाळी सुमारे ९ वाजता सर्व मजूर नेहमीप्रमाणे कामाला लागले. दरम्यान, स्लॅबवरील रेलिंगचे काम सुरू असताना लोखंडी सळई वर चढवली जात होती. अचानक सळईचा एक टोक जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने भीषण अपघात घडला.

या अपघातात मिस्त्री विनोद मुकुंदा बोरकुटे (४६) व हरिदास शशिकांत चुदरी (३४, दोन्ही रा. नवेगाव भु.) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मूल पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. अचानक झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. Mahavitaran power line accident news

महावितरणचे दुर्लक्ष

घरमालकाने बांधकाम सुरू करण्यापूर्वी महावितरणकडे निवेदन देत घराजवळील विद्युततारा बाजूला करण्याची मागणी केली होती. मात्र या निवेदनाकडे महावितरणने दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात झाल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



Leave a Comment