electoral fraud suspicion local news
electoral fraud suspicion local news : चंद्रपूर १ सप्टेंबर २०२५ – देशपातळीवर कांग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे मत चोरचोरीच्या मुद्द्यावर वोटर अधिकार यात्रा सुरू केली आहे, देशातील भाजप सरकार हि मत चोरी करून सत्तेत बसली असा आरोप खासदार गांधी यांनी लावला. अश्याच मतचोरीच्या मुद्द्यावर माजी आमदार व कांग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगविरोधात नाराजी व्यक्त केली.
सणासुदीच्या काळात चंद्रपुरातील मार्गात बदल
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार संघात ६ हजार ८५३ बोगस मतदारांची नावे मतदार यादीत आली होती मात्र काही सजग नागरिकांनी हा मुद्दा उचलला, त्याला कांग्रेस पक्षाने साथ देत प्रशासनाला याबाबत तक्रार दिली. यासंदर्भात राजुरा तहसीलदार यांनी १९ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती, मात्र त्या बोगस मतदाराची नोंदणी कुणी केली यावर अजूनही खुलासा झालेला नाही. 6853 fake voter registrations
कारवाई थंडबस्त्यात
विधानसभा निवडणुकीच्या काळात राजुरा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांच्या प्रचाराचे बॅनर, बिल्ले व इतर साहित्य सहित तब्बल ६१ लाख रुपयांची रोख २० नोव्हेम्बर रोजी मिळून आली होती, त्यावर तक्रार झाली, चौघांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली मात्र अजूनही त्या प्रकरणाची चौकशी थंड बस्त्यात आहे. यावर माजी आमदार धोटे यांनी प्रशासनाला विचारणा केली मात्र तपास सुरु आहे असे सांगण्यात येते, पोलीस व जिल्हा प्रशासन सह निवडणूक आयोगाने आज पर्यंत यावर कारवाई केली नाही अशी माहिती धोटे यांनी दिली. Rajura bogus voters police complaint details
त्याकरिता आम्ही याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा विचार करीत असल्याची माहिती धोटे यांनी दिली. ते पुढे म्हणाले कि राजुरा विधानसभा क्षेत्रात बोगस मतदारांची नोंदणी कुणी केली? यावर प्रशासनाकडे उत्तर नाही, ६१ लाखांची रोख रक्कम कुणाची याचा सुद्धा शोध प्रशासनाने घेतलेला नाही. याचा अर्थ मतचोरी हि चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे, पत्रकार परिषदेत खासदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, विनोद दत्तात्रय व सुनीता लोढिया उपस्थित होत्या.
