FIR against defamatory Facebook post । शेतकरी नेते वामनराव चटपांविरुद्ध बदनामी पोस्ट, युवकांनी केली तक्रार

FIR against defamatory Facebook post

FIR against defamatory Facebook post : राजुरा २० सप्टेंबर २०२५ – शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या विरोधात फेसबुकवर बदनामीकारक भाषा वापरल्याच्या प्रकाराने शेतकरी संघटना आणि युवकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या प्रकरणी राजुरा आणि विरूर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून, तात्काळ गुन्हा नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चांदा महसूल मित्र चॅटबोट चे उदघाटन

शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप यांनी राजुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत,अतुल वरवडे (रा. विसर स्टे.) याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अपमानकारक मजकूर पोस्ट केल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर गजानन ढवस, जीवन आमने, जयराज दोरखंडे, विशाल जिवतोडे यांसह विरूर येथील युवकांनीही विरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. farmer leader defamation Chandrapur

खोटी आणि द्वेषपूर्ण पोस्ट

ॲड. वामनराव चटप हे तीन वेळा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार राहिले आहेत. शेतकरी हक्कासाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या या नेत्याविरोधात सोशल मीडियावरून केलेली खोटी आणि द्वेषपूर्ण पोस्ट ही केवळ त्यांच्या वैचारिक प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न नसून संपूर्ण शेतकरी चळवळीवर घाव घालणारी आहे. शेतकरी संघटना आणि युवकांनी इशारा दिला आहे की, प्रशासनाने या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंदवून दोषींना अटक केली नाही तर आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल.

शेतकऱ्यांच्या नेतृत्वाचा अपमान सहन केला जाणार नाही. समाजात वैमनस्य आणि गोंधळ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. दरम्यान विरूर येथे २१ सप्टेंबरला निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या अश्लिल पोस्टमागील मास्टरमाईंड शोधावा, असे मत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते ॲड. मुरलीधर देवाळकर, माजी जि.प. समाजकल्याण सभापती निळकंठ कोरांगे, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर ढवस, ॲड. श्रीनिवास मुसळे, दिलीप देठे, कपिल इद्दे, सय्यद शब्बीर, मदन सातपुते, आबाजी धानोरकर, मधूकर चिंचोलकर, नरेंद्र काकडे आदींनी व्यक्त केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment