Pombhurna Nagar Panchayat news । पोंभूर्णा नगर पंचायतवर वादाची छाया : ८३ लाखांचा टेंडर घोटाळा न्यायालयात जाणार!

Pombhurna Nagar Panchayat news

Pombhurna Nagar Panchayat news : पोंभूर्णा :-१६ सप्टेंबर – पोंभूर्णा नगर पंचायत अंतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान सन २५-२६ योजने अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे प्रस्तावित अंदाजपत्रकीय किंमत ८३ लक्ष ५१ हजार ८५० रुपयांच्या कामाबाबत सभेत विषय नसतानाही खोट्या व गैरमार्गाने ठराव सर्वानुमते मंजुर असल्याचा खोटा ठराव लिहून टेंडर घोटाळा मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी केल्याचा गंभीर आरोप विरोधी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे. घनकचरा निविदा घोटाळ्याच्या गैरव्यवहाराबाबत न्यायलयात याचिका दाखल करणार असल्याचे विरोधी पक्षनेता आशिष कावटवार, नगरसेवक गणेश वासलवार,अतुल वाकडे,अभिषेक बद्दलवार, नंदकिशोर बुरांडे, रामेश्वरी वासलवार, रिनाताई उराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

अभियंता दिनी जिल्हा परिषदेमधील अभियंत्यांची ओली पार्टी

पोंभूर्णा नगर पंचायत मधील १४ मे २०२५ रोजीच्या सर्वसाधारण सभेच्या विषय नोटीस व टिपणी मध्ये विषय अजेंड्यावर नसतानाही व सभेत या कुठल्याही विषयावर चर्चा झालीच नसल्याने विविध विकास कामांच्या विषयात छुप्या मार्गाने सर्वानुमते ठराव मंजुर करित असल्याचे दाखवत ठराव बुकात नोंद करून जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची मान्यता घेत घनकचारा व्यवस्थापनाचा टेंडर काढण्यात आला आहे. 83 lakh waste management tender scam

pombhurna press

व्हिडीओ वाईस रेकॉर्डिंग नगरसेवकांकडे

नगर पंचायतच्या १४ मे २०२५ ला झालेल्या सर्वसाधारण सभेचा संपूर्ण इतिवृत्त पुढील सभा दिनांक १ जुलै २०२५ च्या सभेतील विषय एक मध्ये मागील सभेचा इतिवृत्त वाचन करून कायम करायला हरकत नसावी असा विषय असताना १ जुलै च्या सभेतील इतिवृत्त वाचण्यात जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत घनकचारा व्यवस्थापनेचा ८३ लक्ष ५१ हजार ८५० रुपयांच्या कामाबाबत वाचनच करण्यात आलेले नाही. त्यामुळे तो विषय कायम कसा करण्यात आला असा सवाल विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे.तसा पुरावा म्हणून १ जुलैच्या सभेची व्हिडीओ वाईस रेकॉर्डिंग नगरसेवकांकडे असल्याचे विरोधी नगरसेवकांकडून सांगण्यात आले आहे. municipal council corruption India

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये नगर पंचायतने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्या अगोदर सभेची मंजूरी घ्यावी लागते. असे असतानाही पोंभूर्णा नगर पंचायतच्या १४ मे २०२५ च्या सभेत हा विषय अजेंड्यावर नसतांनाही पडद्यामागे ठराव प्रोसिडिंगवर विविध विकास कामाची निवड करणे ह्या विषयामध्ये लिहून सर्वानुमते मंजूर दाखवण्याचा बोगसपणा प्रशासनाने व सभाध्यक्षाने केला कसा ? आणि कशासाठी ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीचे निवेदन दिले आहे. या घनकचरा संकलन टेंडर घोटाळ्या बाबत न्यायालयात याचिका टाकून गैरमार्गाने कृत्य करणाऱ्या मुख्याधिकारी, नगराध्यक्ष,व संबंधित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्ष गटनेता आशिष कावटवार,नगरसेवक गणेश वासलवार,अतुल वाकडे,अभिषेक बद्दलवार,नंदकिशोर बुरांडे, रामेश्वरी वासलवार, रिनाताई उराडे यांनी आयोजित पत्रपरिषदेतून केला आहे.

Leave a Comment