Respect for motherhood insult controversy
Respect for motherhood insult controversy : चंद्रपूर: भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, चंद्रपूरने (BJP Mahila Morcha, Chandrapur) काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करत जोरदार आंदोलन केले. AI प्रणालीचा (AI system) गैरवापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि त्यांच्या आईचा अपमानकारक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाने जटपुरा गेट येथे काँग्रेसविरोधात जोरदार निदर्शने केली. Respect for motherhood insult controversy
दुकानाच्या शेडमध्ये घुसला ट्र्क, एकाचा मृत्यू
हे आंदोलन भाजपच्या प्रदेशाध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आले होते. माजी खासदार हंसराज अहिर (Hansraj Ahir), आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar), आणि भाजप शहर जिल्हाध्यक्ष सुभाष कासंगोटूवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. छबूताई वैरागडे (Chhabutai Vairagade) यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. Legal action demanded for insulting PM’s mother via video
काँग्रेसवर ‘विष पेरणारे’ आणि ‘मातृशक्तीचा अपमान करणारे’ असल्याचा आरोप
आंदोलनादरम्यान बोलताना सौ. वैरागडे यांनी काँग्रेस पक्षावर बिहार निवडणुकीच्या (Bihar election) मुद्द्यावरून समाजात विष पेरण्याचा आणि मातृशक्तीचा अपमान करण्याचा आरोप केला. “पंतप्रधान पद हे देशाचे असते आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरणे, इतकेच नाही तर वाईट पद्धतीने चित्र रेखाटणे हा देशातील समस्त मातृशक्तीचा अपमान आहे. देशातील माता-भगिनी काँग्रेसचे हे विष कधीही सहन करणार नाहीत,” असे त्या म्हणाल्या.
भाजपच्या महिला आघाडीने राजीव गांधी (Rajiv Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची विचारसरणी नेहमीच समाजात दुही निर्माण करणारी आणि नारीशक्तीचा अनादर करणारी राहिली आहे, असा दावाही केला. Chandrapur BJP women’s morcha condemnation video incident

आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित
13 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या या निषेध आंदोलनात भाजपचे चंद्रपूर शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला मोर्चाचे कार्यकर्ते आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात विधानसभा प्रमुख वंदना हातगावकर, मंडळ अध्यक्ष स्वप्नील डुकडे, रवि जोगी, सुभाष आदमने, प्रदीप किरमे, विठ्ठल डुकडे, युवा मोर्चाचे मयूर वाढई, सुमित बेले, राकेश बोंमनवार, अक्षय घोटेकर, पुष्पा उराडे, मंजुश्री कासंगोटूवार, प्रज्ञा गदेवार, माजी नगरसेविका वनिता डुकडे, नीलिमा वनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. BJP protests against Congress over misuse of AI system video
या आंदोलनातून भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, जिल्हा चंद्रपूरने काँग्रेस पक्षाचा तीव्र निषेध केला असून, देशातील महिलांचा आदर राखण्याचे आवाहन केले आहे.