Shiv Sena protest against mobile tower
Shiv Sena protest against mobile tower : भद्रावती गौतम नगर (स्नेहल नगर) येथे परवानगीशिवाय उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत मोबाईल टॉवर विरोधातील शिवसेना (शिंदे गट) तर्फे सुरू केलेल्या साखळी उपोषण आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. हे आंदोलन शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वाखाली दमदारपणे पार पडले.
कोरपना हादरलं, विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू तिघे जखमी
आज आंदोलन स्थळी आमदार करण देवतळे साहेब यांनी भेट देऊन आंदोलकांची भूमिका ऐकली. नागरिकांच्या भावना आणि शिवसेनेची ठाम भूमिका लक्षात घेऊन आमदार साहेबांनी सर्व मुद्दे मान्य करत खालीलप्रमाणे आश्वासन दिले.
✅ संबंधित मोबाईल टॉवरचे काम तत्काळ थांबविण्यात येईल.
✅ परवानगीशिवाय टॉवर उभारणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल.
✊ शिवसेनेच्या ठाम लढ्यामुळे प्रशासनाला झुकावे लागले आहे. आमदार साहेबांच्या विनंतीचा मान राखत आंदोलकांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले, मात्र गरज पडल्यास पुन्हा उग्र लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला.
हा विजय सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा
हे आंदोलन यशस्वी ठरले असून, हा विजय सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा आहे असे मनोगत शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांनी व्यक्त केले. protest against illegal mobile tower
यावेळी युवा शिवसैनिक सुमित हस्तक, महेश जीवतोडे, सौ. अर्चनाताई खंडाळे, सौ. लक्ष्मीबाई गेडाम, सौ. निर्मला पेटकर, धबुताई असूटकर, माधुरीताई फुकट, प्रियाताई तेलंग, सीमाताई वानखेडे, वैशालीताई चालखुरे, सरस्वती दानव, प्रतिभाताई नागपुरे, नंदाताई कोरडे, वैशालीताई तेलंग, नंदाताई ठमके, सिंधुताई देऊरकर, सुनिता ताई उताने, श्री अरुण मत्ते, श्री यशवंत उताणे, श्री अशोक चिलके, सौ मंगला अशोक चिलके, सौ पुष्पा किशोर सीरसैया आंदोलनात सहभागी होते.
