Chandrapur rural women job scam news । 🚨 चंद्रपूर ग्रामीण भागात महिलांसाठी खोट्या नोकरीच्या फसवणुकीची घटना

Chandrapur rural women job scam news

Chandrapur rural women job scam news : चंद्रपूर (९ ऑक्टोबर २०२५) News३४ वृत्त – स्वयंभू सनराईज ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थांद्वारे गावागावात माय इंडिया निधी बँकेची शाखा स्थापन करीत त्या बँकेत विविध पदावर भरती प्रक्रिया राबवित अनेक महिलांना लाखोंचा चुना लावणाऱ्या आरोपीला नागभीड पोलिसांनी अटक केली, सदर आरोपी हा दैनिक वृत्तपत्राचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत होता.

Also Read : गोंडवाना विद्यापीठाचा मोठा निर्णय, मार्कशीट मध्ये होणार हा बदल

७ ऑक्टोबर रोजी नागभीड पोलीस स्टेशनमध्ये ३४ वर्षीय भारती फुलचंद फाले यांनी तक्रार दिली कि वरोरा तालुक्यातील जामगाव मध्ये राहणार ३९ वर्षीय राजेंद्र विनोद मेश्राम याने आपल्या संस्थेद्वारे गावागावात माय इंडिया निधी बँकेची स्थापना केली होती. त्या शाखेमध्ये फिर्यादी भारती फुले यांना एरिया मॅनेजर पदावर नोकरी देतो तसेच इतरही महिलांना नोकरी देण्याचे आमिष दाखविले. विशेष म्हणजे फिर्यादी महिलेला मेश्राम यांनी नोकरीची खोटी ऑर्डर तयार करीत ती खरी आहे असे भासवीत फिर्यादी व इतर महिलांची ५ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली. Chandrapur My India Fund Bank fraud news

आरोपी निघाला पत्रकार

फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यावर याबाबत महिलांनी नागभीड पोलीस स्टेशनमध्ये राजेंद्र मेश्राम यांच्याविरुद्ध तक्रार दिली, ८ ऑक्टोबर रोजी राजेंद्र मेश्राम ला पोलिसांनी अटक केली, सदर आरोपी राजेंद्र मेश्राम हा दैनिक कळमनगरी वृत्तपत्राचा चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत होता. आरोपीची अधिक माहिती पोलिसांनी घेतली असता फसवणुकीबाबत मेश्राम यांच्यावर जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात सपोनि दिलीप पोटभरे, पोलीस कर्मचारी दीपक कोडापे व दिलीप चौधरी यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment