Selfie with pothole Chandrapur
Selfie with pothole Chandrapur : चंद्रपूर: चंद्रपूर शहर आणि परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि नागरिकांना या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी “सेल्फी विथ खड्डा!” नावाचे एक अभिनव अभियान सुरू केले आहे.
Also Read : चंद्रपूर शहरातील मार्गाचा होणार कायापालट
“एक फोटो खड्डेमुक्त चंद्रपूरसाठी” या उद्देशाने सुरू केलेल्या या अभियानात, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी त्यांच्या परिसरातील धोकादायक खड्ड्यासोबत सेल्फी काढावा. हा फोटो सोशल मीडियावर खा. प्रतिभा धानोरकर यांना टॅग करून पोस्ट करावा. याव्यतिरिक्त, नागरिकांनी फोटोसह गुगल लोकेशन देखील खा. प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला पाठवायचे आहे.
प्रशासनावर दबाव वाढणार
या उपक्रमाद्वारे रस्त्यांवरील खड्ड्यांची नेमकी माहिती आणि तीव्रता जमा केली जाईल, ज्यामुळे प्रशासनावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी दबाव वाढेल.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे की, “तुमचा एक फोटो ठरेल बदलाची सुरुवात!” प्रत्येक नागरिकाचा सहभाग खड्डेमुक्त चंद्रपूरच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असेल.
चंद्रपूरमधील रस्ते सुरक्षित आणि सुस्थितीत असावेत यासाठी नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.
अधिक माहिती आणि फोटो पाठवण्यासाठी संपर्क:
संपर्क क्रमांक: ९८८१०१६७१४ / ८०१०७२३७५९