Chimur forest human conflict latest
Chimur forest human conflict latest : चिमूर 6 नोव्हेंबर (NEWS34) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात सतत वाढ होत आहे, वर्ष 2025 मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 38 नागरिकांचा बळी गेला आहे. 5 ऑक्टोबर रोजी चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ईश्वर भरडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
Also Read : चंद्रपुरातील अल्पवयीन गुन्हेगारी
चिमूर तालुक्यातील शंकरपूर जवळील आंबोली रोडवर असलेल्या शेतात ईश्वर भरडे कापूस वेचायला गेले होते. सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान त्या परिसरात दबा धरून बसलेल्या शेतकरी भरडे यांच्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले.
45 वर्षीय शेतकरी ईश्वर भरडे हे शिवरा गावात राहत होते, या घटनेमुळे परिसरात जनतेचा रोष बघायला मिळाला, वाघाचे हल्ले सतत होत राहिल्यास शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
आतापर्यंत 38 मृत्यू
या घटनेनंतर नागरिकांनी वाघाचा बंदोबस्त तात्काळ करावा अशी मागणी करीत काही काळ चक्काजाम आंदोलन सुद्धा केले. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 34 वाघाच्या हल्ल्यात, 2 बिबट, 1 अस्वल व एकाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. एकूण 38 मृत्यू वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाले आहे.










