Juvenile crime Chandrapur
Juvenile crime Chandrapur : चंद्रपूर ५ नोव्हेम्बर (News३४) – २२ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीची घटना घडली होती ज्यामध्ये तब्बल २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला होता, शहर पोलिसांना या प्रकरणात दीड महिन्यांनी यश मिळाले असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
२२ सप्टेंबर ला नांदगाव पोडे मध्ये राहणाऱ्या ३४ वर्षीय नीता आकाश आत्राम या आपल्या बिनबा गेट मध्ये राहणाऱ्या आईकडे गेली होती, रात्री घराचा दरवाजा टेकवून नीता आत्राम ह्या झोपी गेल्या असत्या त्यावेळी अज्ञाताने घरी प्रवेश करीत सोनीचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या जिवत्या व रोख रक्कम असा एकूण २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमालावर हात साफ केला.
Also Read : चंद्रपुरात मनसे पक्षात असंख्य नागरिकांचा प्रवेश
याबाबत नीता आत्राम यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता तब्बल दीड महिन्याच्या कालावधीनंतर चोरीचा गुन्हा विधिसंघर्ष बालकाने केला असल्याचे निष्पन्न होताच, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी विधिसंघर्ष बालकाकडून १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Chandrapur minor theft arrest
अनेक गुन्हे उघड
विशेष बाब म्हणजे त्या विधिसंघर्ष बालकाने चंद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरी व इतर गुन्हे केले असल्याची कबुली दिली, आरोपी बालकाकडून दुचाकी क्रमांक MH ३४ BS २४५२ सह तब्बल १७ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल अँपल कंपनीचा लॅपटॉप असा एकूण ३ लाख २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटें, विलास निकोडे, संजय धोटे, सचिन बोरकर, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, भावना रामटेके, कप्र्रचंड खरवार, रुपेश पराते, निलेश ढोक, योगेश पिदूरकर, विक्रम मेश्राम, प्रफुल भैसारे, दीपिका झिंगरे व सारिका गौरकार यांनी केली.










