Maharashtra Local Body Elections Date
Maharashtra Local Body Elections Date : चंद्रपूर ४ नोव्हेम्बर (News३४) – महाराष्ट्र राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहे. २ डिसेम्बर ला मतदान तर ३ डिसेम्बर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. ४ नोव्हेम्बरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
Also Read : महानगरपालिकेमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची तक्रार
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नगरपंचायत व नगरपालिकेच्या निवडणूका घेण्यात येणार असून पुढच्या टप्प्यात जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहे. राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद तर १ नगरपंचायतीची होणार निवडणूक
- बल्लारपूर नगरपरिषद
- भद्रावती
- वरोरा
- ब्रह्मपुरी
- घुग्गुस
- राजुरा
- गडचांदूर
- चिमूर
- मूल
- नागभीड नगरपरिषद
- भिसी नगरपंचायत
चंद्रपूर जिल्ह्यात १० नगरपरिषद तर ७ नगरपंचायती आहे, ६ नगरपंचायतीमध्ये वर्ष २०२२ मध्ये निवडणूक झाली आहे. निवडणूक झालेल्यामध्ये सिंदेवाही, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना, जिवती चा समावेश आहे.
असं आहे निवडणुकीचे वेळापत्रक
- नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
- अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
- छाननी – 18 नोव्हेंबर
- अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
- निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेेबर
- मतदान – 2 डिसेंबर
- निकाल – 3 डिसेंबर










