MCOCA charges filed against organized crime gang
MCOCA charges filed against organized crime gang : चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीने धुमाकूळ घातला आहे, भाईगिरी, मर्डर, चोरी व दरोडा अश्या अनेक गुन्हेगारीने जिल्हा ढवळून निघाला असून यावर चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई करणाऱ्या बल्लारपुरातील संयुक्त गुन्हेगारीमध्ये लिप्त असणाऱ्या गुंडांच्या टोळीवर थेट मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.
सर्व सामान्य जनतेत दहशत निर्माण करणाऱ्या अनेक गुन्हयांची नोंद असलेल्या बल्लारपूर येथील कुख्यात गुंडाची टोळीतील टोळी प्रमुख नामे चंद्रेश उर्फ छोटु देसराज सुर्यवंशी, येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक व त्याचे इतर साथीदारांनी संयुक्तरित्या केलेल्या गुन्हयातील सदस्यांविरुध्द पोस्टे चंद्रपूर शहर येथील दाखल गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (MCOCA) ची कलम लावण्यात आलेली आहे.
Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा जंगलराज; वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
काही दिवसांपूर्वी हत्या सारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीतील काहींना अवैध शस्त्रसह पोलिसांनी अटक केली होती ज्यामध्ये ०२ माऊझर गन (पिस्टल), ०२ देशी कटट्टे, ३५ नग जिवंत काडतुस, तसेच ०४ लोखंडी धारदार खंजर असे घातक हत्यारासह दरोडा टाकण्याचे बेतात असल्याचे मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अप.क्र.७५८/२०२५ कलम ३, ४/२५ भारतीय हत्यार कायदा आणि कलम ३१० (४) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासात, सदर टोळी ही दरोडा टाकुन प्राप्त पैशातून खुना सारखा गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत असल्याचे निष्पन्न झाले असुन पोलीसांच्या सतर्कतेने खुनाच्या गुन्हयास प्रतिबंध करण्यास यश आले आहे. MCOCA sections applied to gang leaders 2025
अनेक वर्षांपासून या टोळीचा धुमाकूळ
सदर गुन्हयातील कुख्यात टोळी ही चंद्रेश उर्फ छोटु देसराज सुर्यवंशी व येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक याचे नेतृत्वात स्वतःच्या टोळीचा वर्चस्व निर्माण करण्यासाठी मागील काही वर्षापासुन चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने बेकायदेशीर जमाव तयार करुन दहशत निर्माण करणे, जिवानिशी ठार करण्याचे उददेशाने खून करण्याचा प्रयत्न करणे, आपखुशीने गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, अश्लिल शिवीगाळ करणे, दंगा करणे,
जिवे ठार मारण्याची धमकी देणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक रस्त्यामधील मार्गात अटकाव करणे, प्राणघातक शस्त्रे जवळ बाळगणे, मनाई आदेशाने उल्लंघन करणे इत्यादी शिर्षकाखाली गंभीर गुन्हे केले असुन टोळीचे वर्चस्व व दहशत राहावी म्हणुन त्याद्वारे मिळणारे पैश्यावर ऐशआरामाचे, चैनीचे जीवन जगत आहेत. police foil robbery attempt by armed criminals
हे गुन्हे या टोळीने स्वतः चे आर्थीक फायदा करण्याकरीता, वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरिता केलेले असून अद्यापही ते संघटीत पध्दतीने गुन्हेगारी कारवाया व कृत्ये सातत्याने करीत असल्याने सदर टोळीवर कायद्याची वचक व परिणामकारक प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्याविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ चे कलम समाविष्ट होणेबाबतचा आवश्यक प्रस्ताव पाठवून सदर टोळीतील
(१) चंद्रेश उर्फ छोटु देसराज सुर्यवंशी वय २३ वर्ष, (२) येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक वय २७ वर्ष, (३) मुकेश राजु वर्मा वय २० वर्ष, (४) अमीत बालकृष्ण सोनकर वय २६ वर्ष, (५) गौरिश श्रीनिवास कुसमा वय १९ वर्ष, (६) अनवर अब्बास शेख वय २३ वर्ष च इतर साथीदार गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ (MCOCA) ची कलम लावण्यात आली आहे. MCOCA charges filed against organized crime gang
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर श्री प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे चंद्रपूर शहर चे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री निशिकांत रामटेके आणि स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, सफौ अरुण खारकर व पोअं गजानन नन्नावरे व मोक्का पथकाने केलेली आहे. chandrapur police
याद्वारे सर्व जनतेला तसेच औद्योगिक क्षेत्रातील व्यवसायिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारच्या कोणत्याही गुंडांच्या टोळीच्या अवैध मागणी/खंडणीला प्रतिसाद देवु नये. किंवा त्यांच्या कृत्यांना घाबरु नये. त्यांच्या कृत्यांबाबत तात्काळ नजीकचे पोलीस स्टेशनला रिपोर्ट करुन माहिती दयावी जेणे करुन अशा स्वरुपाच्या गुन्हेगारीला वेळीच प्रतिबंध घालण्यास पोलीसांना मदत होईल.










