PM Shikau Umedwari Rojgar Mela Chandrapur
PM Shikau Umedwari Rojgar Mela Chandrapur : चंद्रपूर, दि. 06 (News३४) : ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच बीटीआरआय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, चंद्रपूर येथे 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळावा तसेच रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळावा सर्व व्यवसायाच्या आजी व माजी आयटीआय पास, शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता असून नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी येणार आहे.
Also Read : जानेवारी महिन्यात चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे होणार लोकार्पण
प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी योजना ही केंद्र शासन पुरस्कृत असून कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येत येते. याद्वारे औद्योगिक आस्थापनेत आपले कौशल्य विकसित करून आत्मनिर्भर होण्याची व रोजगाराची संधी उपलब्ध होते. सदर योजनेमुळे प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराचे धड़े मिळतात.
रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी तसेच रोजगार मेळावा अंर्तगत विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून सदर संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बीटीआरआय कार्यालयाचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार व संस्थेचे प्राचार्य गजानन राजूरकर यानी केले.
शिकाऊ उमेदवारीकरिता निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार कंपनीतर्फे सोयी सुविधा उपलब्ध राहतील. मेळाव्यायाकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी गटनिदेशक श्री. टोंगे व योगेश धवणे (9405912096) यांच्याशी संपर्क साधावा.










