चंद्रपूरमध्ये जटपुरा वॉर्डात दुहेरी घरफोडी! ६२ हजारांचा मुद्देमाल चोरी

Chandrapur double burglary : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर शहरातील जटपुरा वार्डात दोन ठिकाणी घरफोडीची घटना घडली असून यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व लॅपटॉप असा एकूण ६७ हजारांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला, शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. (हे वाचा – ब्रह्मपुरीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २४ लक्ष रुपयांचा मुद्देमाल, ३ आरोपींवर गुन्हा दाखल)

एकाच दिवशी २ घरफोड्या

पहिल्या गुन्ह्यात फिर्यादी २९ वर्षीय निलेश खाडिलकर राहणार जटपुरा वॉर्ड हे ६ डिसेंबर रोजी सकाळी कुटुंबासह घराला कुलूप लावत गडचिरोली मध्ये कार्यक्रमानिमित्त गेले होते, ८ डिसेंबर रोजी सकाळी निलेशच्या काकांनी माहिती दिली कि घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आहे, माहिती मिळाल्यावर निलेश कुटुंबासह घरी आला असता घरातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत होते. लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल चोरी झाला. अशी माहिती निलेश ने पोलिसांना दिली. Chandrapur double burglary

६२ हजार रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ

दुसरी घटना निलेश खाडिलकर यांचे शेजारी नयन दिवाकर मोहुर्ले यांच्या घरी चोरी झाली, ७ डिसेंबरला नयन मोहुर्ले हे ड्युटीवर गेले होते, ८ डिसेंबर ला सकाळी नयन घरी पोहोचले असता तर त्यांच्या घराचेही दारावरील कुलूप तुटलेल्या अवस्थेत होते. घरातील बेडवरील ठेवलेला लॅपटॉप व रोख रक्कम असा एकूण १७ हजारांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला होता.

दोन्ही घरफोडीच्या घटना एकाच दिवशी घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले कि काय? असे प्रश्न उपस्थित झाले आहे. घरफोडीच्या दोन्ही घटनेत एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला असल्याची तक्रार शहर पोलीस ठाणे चंद्रपूर मध्ये देण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञातांवर कलम ३०५, ३३१ (४) व ३३१ (३) अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे.

Leave a Comment