Stree Shakti Samvad Yatra : महिलांनी केला निर्धार संदीप गिर्हे आमचा आमदार

बल्लारपूर विधानसभा आम्ही लढणार व जिंकणार – माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा विश्वास

Stree Shakti Samvad Yatra चंद्रपूर :- शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रपूर महिला आघाडीच्या वतीने स्त्रि-शक्ती संवाद यात्रा निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन मुबईच्या माजी महापौर तथा शिवसेना उपनेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १९ सप्टेंबर रोजी बल्लारशाह येथील नाट्यगृहात पार पडला.
यावेळी किशोरीताई पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील उपस्थित महिलांनी ‘ मशाल ‘ घरा-घरात पोहचवण्याचे वचन दिले.

अवश्य वाचा : वडेट्टीवार यांच्यासमोर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हा नेता लढणार


यावेळी किशोरी पेडणेकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या राज्यात स्त्रि-अत्याचाराची प्रलंबित प्रकरणे आहेत,कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे.मात्र महिला सुरक्षेचं सोडून सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्यासाठी जाहिरातीवर अव्वाढव्य खर्च करून राज्याची तिजोरी लुटण्याचे काम केले आहे.अशा राजकीय स्वार्थी धोरणामुळे खरच स्त्रि-सुरक्षा अबाधित राखल्या जाणार आहे का? असा प्रश्न यावेळी या महाघातकी सरकारला कीशोरीताई पेडणेकर यांनी उपस्थित केला. (Stree Shakti Samvad Yatra)

चंद्रपुरातील सहा विधानसभेतील बल्लारपुर विधानसभा मतदार संघासह आणखी एक विधानसभा मतदार संघ शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकरिता सुटतील असा प्रयत्न पक्षाकडून चालु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.संदिप गिऱ्हे यांनी पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठी बल्लारपूर विधानसभा पिंजून काढत आहे.गिऱ्हे यांना युवक व महिलांची मोठी पसंती मिळत आहे.एवढेच नव्हे तर शहर व गावात संदिप गिऱ्हे यांना उमेदवारी देण्याच्या संबंधाने कार्यकर्ते कामाला लागले आहे.त्यामुळे येणाऱ्या बल्लारपूर विधानसभा निवडणुकीसाठी गिऱ्हे यांच्या सोबत कटिबध्द राहण्याचा संदेशही उपस्थित महिलांना पेडणेकर यांनी दिला. (Stree Shakti Samvad Yatra)

शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे यांनी महिलेच्या सुरक्षितेतचा प्रश्न उपस्थित करून सरकारने महिलेच्या सुरक्षितेसंबंधीत ठोस पाऊले उचलली नसल्याने आज महिलांना असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे ते बोलत होते.या सरकारने फक्त जाहिरातबाजी व इव्हेंटवर करोडोचा खर्च करण्याचाच काम केला आहे. पण वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न,महिलांची सुरक्षा, लोकांना शुद्ध पाणी, आरोग्य सेवा याकडे सरकारने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अश्या सरकारला आपण हद्दपार करणे गरजेचे आहे.त्यामुळे बल्लारपूर विधानसभेतील सर्व महिलांनी हातात मशाल घेऊन क्रांती घडवून आणण्याची वेळ आली आहे असा निर्धार महिला मेळाव्यातून त्यांनी व्यक्त केला. (Stree Shakti Samvad Yatra)

यावेळी ‘ स्त्रि-संवाद यात्रा ‘ महिला मेळाव्याला शिवसेना चंद्रपूर संपर्क प्रमुख प्रशांत कदम, चंद्रपूर जिल्हा संपर्क संघटिका सुषमा साबळे, महिला आघाडी संपर्क नेत्या सोनाली म्हात्रे,पक्ष निरीक्षक शालिनीताई सावंत,पक्ष निरीक्षक निधीताई शिंदे, नागपूर जिल्हा संपर्क संघटिका मंदाकिनीताई भावे, जिल्हा प्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे, उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव,महिला जिल्हाप्रमुख कल्पनाताई गोरघाटे, प्रमोद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!