Terror of tigers : मूल तालुक्यात वाघाची दहशत, संतोष रावत आक्रमक

Terror of tigers (गुरू गुरनुले) मुल – मरेगांव येथील वाघाच्या हल्याची घटना ताजी असतांना परत १९ सप्टेंबर २४ रोजी चीचोली येथील देवाजी राऊत यांनीही वाघाने ठार केले. हा शेतकरी, गुराखी यांचेवर नेहमीच होणारी जीवित हानी एक अन्यायच आहे. हे किती दिवस जनता सहन करणार, यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा वरिष्ठ वनाधिकारी व वनपरिक्षेत्र अधिकारी मुल यांना संतोषसिंह रावत यांनी दिला.


Terror of tigers दिनांक २१ सप्टेंबर रोजी चिंचोली येते मृतक देवाजी राऊत यांच्या घरी भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले,विचारपूस केली. आर्थिक सहकार्यही केले. तेव्हाच सी.डी.डी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी इशारा दिला.

अवश्य वाचा : चंद्रपुरात 7 वर्षीय मुलाची बिबट्याने केली शिकार


चिचोली,मरेगांव येथील दोन्ही घटना एकामागे एक घडल्या असल्याने गावकरी व शेतकऱ्यांमध्ये वाघाची दहशत पसरली आहे.जिवाच्या भीतीने शेतात जाणे सोडले आहेत. तरी देखील वनविभाग,वनाधिकारी कुठलीही दखल घेतलेली नाही.आणि वनसंरक्षक व विभागीय वनाधिकारी चंद्रपूर यांनी आमदार सुभाष धोटे, सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व मृतकाचे कुटुंबीय आणि अनेक कांग्रेस पदाधिकारी यांना दिलेल्या तोंडी आश्वासनांचे काय,असा प्रश्नही केला आहे.

विधानसभा निवडणूक प्रचाराचा भाजपने केला शुभारंभ

Terror of tigers पहिले वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा,करंट दांडा द्यावा,मृतकाचे मुलांना वनविभागाने नोकरी द्यावी,अशी मागणी रावत यांनी केली असून येत्या आठ दिवसांत मागणी पूर्ण केली नाही तर तीव्र आंदोलन करणार असा खंबीर इशाराही दिला.

यावेळी सभापती राकेश रत्नावार, कांग्रेस जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर,विवेक मुत्यलवार,सुरेश फुलझेले,अतुल गोवर्धन,संदीप मोहबे, पोलिस पाटील श्रीकृष्ण चचाने, मनोज ठाकरे, साईनाथ मंगाम, आकाश राऊत, विनोद राऊत, यांचेसह चिंचोली ग्रामस्थ उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!