Guru Dakshina : सुधीर मुनगंटीवार यांची अशीही गुरुदक्षिणा

Guru dakshina शिक्षण घेऊन शाळेतून बाहेर पडल्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थी भरारी घेतात. नाव कमावतात. आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करतात. पण मोजकेच विद्यार्थी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची जाणीव ठेवतात. त्यातही ना. सुधीर मुनगंटीवार त्या शाळेचे माजी विद्यार्थी असतील, तर गुरुदक्षिणा म्हणून शाळेला किती अधिक देता येईल याचा विचार करतात. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील ज्युबिली हायस्कूलसाठी ज्या भावनेतून परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे, ती कुठल्याही माजी विद्यार्थ्यांसाठी आदर्श बाब ठरावी.

Jubilee High School chanda

Guru dakshina राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजी आणि पाचवे सरसंघचालक प.पू के.सुदर्शन यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेतील बाकांवर श्री. सुधीर मुनगंटीवार यांना शैक्षणिक, सामाजिक धडे गिरवता आले. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण या शाळेत झाले. त्यानंतरचा ना. मुनगंटीवार यांचा लोकनेता म्हणून प्रवास साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण आपण आपल्या शाळेसाठी काहीतरी करावे, अशी जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली.

तर चंद्रपूर जिल्ह्यात जन आंदोलन होणार – अभिलाषा गावतुरे यांचा इशारा

एका माजी विद्यार्थ्याची गुरुदक्षिणा म्हणून ना.सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषद (मा.शा) ज्युबिली हायस्कूल तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या नुतनीकरणाचा निर्णय घेतला. ही खऱ्या अर्थाने एका माजी विद्यार्थ्याची आदर्श गुरुदक्षिणा ठरत आहे. नूतनीकरणांतर्गत इमारतीची संपूर्ण दुरुस्ती, नवीन फ्लोरिंग, नवीन छत, फॉल सीलिंग, दरवाजे खिडक्यांची दुरुस्ती, अनेक ठिकाणी प्लास्टर, डिजिटल क्लासरूम, आधुनिक फर्निचर, प्रयोगशाळा दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.  (Guru dakshina)

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये पेन्शन

ना. श्री. मुनगंटीवार यांनी आज महाविद्यालयाच्या नुतणीकरणाच्या कामाची पाहणी केली आणि माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी वाचनालयाचा विशेष उल्लेख केला. 14 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून अत्याधुनिक वाचनालय येथे तयार करण्यात येणार आहे. ई -लायब्ररी पासून सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध होतील. या लायब्ररीमध्ये संदर्भ ग्रंथ, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेचे ज्ञान तसेच जगाच्या कोणत्याही ठिकाणावरून विद्यार्थ्यांना येथे शिकता येईल, अशा सुविधा निर्माण केल्या जातील. (Guru dakshina)

संस्कारांचं माहेरघर


ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व महाराष्ट्राला कळले. पण ते ज्युबिली हायस्कूलच्या बाकांवर घडले. याच बाकांवर त्यांना पर्यावरणाचे धडे मिळाले आणि इथेच त्यांच्यातील गुणी विद्यार्थी घडला. आणि आज महाराष्ट्रात सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य बघितले तर शाळेने दिलेल्या संस्कारांची जाणीव होते. ना. श्री. मुनगंटीवार यांच्यासाठी त्यांची शाळा खऱ्या अर्थाने संस्कारांचं माहेरघर ठरले आहे.

गुरू दक्षिणा

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!