no parking zone : चंद्रपूर शहरातील हा मार्ग 28 सप्टेंबर ला राहणार बंद

no parking zone मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात चंद्रपूर शहरात 28 सप्टेंबर रोजी चांदा क्लब ग्राउंडवर भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीला अडथळा निर्माण न व्हावा म्हणून वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक हा मार्ग सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद असणार आहे.

No parking zone महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असून आतापर्यंत 3 हफ्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.

अवश्य वाचा : चंद्रपुर जिल्ह्यातील अभिजित ला मिळाली 52 लक्ष रुपयांची शिष्यवृत्ती

त्यासंदर्भात चंद्रपुरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, सदर मेळाव्यात 5 हजार महिला उपस्थित राहणार आहे.
याकरिता नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वरोरा नाका चौक ते प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक पर्यंतचा मार्ग बंद राहणार आहे.
या मार्गावर 28 सप्टेंबरला सर्व प्रकारची वाहतूक बंद असणार आहे.
सदर मार्ग हा नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.


नागरिकांनी या दरम्यान पडोली कडून शहरामध्ये जाणारी वाहतूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, जटपुरा गेट या मार्गांचा वापर करावा कीं सावरकर चौक, बस स्टॉप, प्रियदर्शिनी चौक व जटपुरा गेट चा वापर करावा असे आवाहन प्रभारी पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांनी केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!