Governor’s visit : राज्यपाल राधाकृष्णन यांचा दौरा आणि हे मार्ग राहणार बंद

Governor’s visit 1 ऑक्टोबर रोजी राज्याचे राज्यपाल सिपी राधाकृष्णन चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने जिल्ह्यातील काही मार्ग त्यादिवशी बंद असणार आहे असा आदेश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जारी केला आहे.

Governor’s visit 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता राज्यपाल राधाकृष्णन चंद्रपुरात दाखल होणार आहे, त्यानंतर नियोजित दौऱ्यात विविध मान्यवरांच्या भेटी घेणार असून दुपारी 3 वाजेदरम्यान पोम्भूर्णा येथे भव्य आदिवासी मेळाव्यात राज्यपाल राधाकृष्णन उपस्थित राहणार आहे.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचीच चर्चा

आदिवासी मेळाव्यात मोठया प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहणार आहे, त्या पार्श्वभूमीवर उपस्थित राहणारे नागरिक व इतर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33(1) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी रहदारी सुरळीत रहावी यासाठी अवजड वाहतूक सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक बंद असणार आहे.

गोपाल नगर टी पॉईंट ते पोम्भूर्णा व देवाळा गाव ते पोम्भूर्णा पर्यंत जड वाहतूक आवश्यकतेनुसार बंद राहणार , या कालावधीत वाहतूक दारांनी चंद्रपूर कडून पोम्भूर्णा किंवा गोंडपीपरी कडे जाण्याकरिता गोपाल नगर टी पॉईंट-बोडा गाव-उमरी टी पॉईंट-बोर्डा (बोरकर) टी पॉईंट-बोर्डा दीक्षित-बोर्डा फाटा-नवीन गंगापूर-कसरगटा-पोम्भूर्णा या मार्गाचा अवलंब करावा.

पोम्भूर्णा कडून चंद्रपूर कडे जाण्याकरिता कसरगटा-नवीन गंगापूर-बोर्डा फाटा – गोपाल नगर टी पॉईंट ते चंद्रपूर रोडचा अवलंब करावा, मूल कडून पोम्भूर्णा किंवा गोंडपीपरी जाण्याकरिता देवाळा-थेरगाव-सेलूर-नागरेडी-वेळवा गाव-पोम्भूर्णा या मार्गाचा वापर करावा.

पोम्भूर्णा कडून मूल कडे जाण्याकरिता वेळवा गाव-सेलूर नागरेडी-थेरगाव-देवाळा मूल या मार्गाचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!