Exclusive Mla kishor jorgewar : आमदार जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशावर स्थानिक नेत्यांचा अडथळा

mla kishor jorgewar जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाच्या सुखर वाटेत स्थानिक नेत्याच्या ब्रेकर

Mla kishor jorgewar राजकारणाच्या रंगमंचावर सध्या चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात एक नवा धागा विणला जात आहे. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा हवेत भरकटत असताना, या प्रवेशावर स्थानिक नेत्याने अडथळा घातल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नेत्यांच्या अट्टहासामुळे भाजपला चंद्रपूरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसविरोधात कमकुवत उमेदवार मिळेल का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

अवश्य वाचा : शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांना हद्दपारीची नोटीस, राजकारणात ट्विस्ट येणार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच चंद्रपूरचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संपर्कात असल्याचे सांगून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेला हवा दिली. मात्र, या चर्चेत त्यांनी विशेषतः सुधीर मुनगंटीवार यांच्याशी याबाबत सल्लामसलत करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले होते. Mla kishor jorgewar

लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा

सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील कटुता सर्वांनाच ज्ञात आहे. लोकसभा निवडणुकीत मात्र जोरगेवार यांनी शेवटच्या क्षणी मुनगंटीवार यांच्यासाठी प्रचाराच्या रणांगणात उडी घेतली होती. यंग चांदा ब्रिगेडच्या पाच हजार कार्यकर्त्यांसमोर उभे राहून त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा दिला होता. त्या वेळी मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांच्या समर्थनाची व्याजासह परतफेड करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे जोरगेवार भाजपच्या तिकिटावर लढतील असे संकेत मिळाले होते.

जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाची प्रतीक्षा लांबत असून, त्यामागे स्थानिक नेत्यांचा हात असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. जोरगेवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात, तसेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याशीही त्यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. भाजपकडे जोरगेवार यांच्याइतका प्रभावी उमेदवार नसतानाही त्यांचा प्रवेश लांबणीवर ठेवणे हे अनेकांना आश्चर्यकारक वाटत आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांमुळे जोरगेवार यांचा भाजप प्रवेश रखडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उडी घेत इतिहास रचला, भाजपच्या विजयाला जोरगेवार यांनी मोठे खिंडार पाडले, त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देत विधानसभा क्षेत्रातील महत्वाची कामे केली.

अडीच वर्षांनी राज्यात महायुतीचे सरकार आले, यावेळी जोरगेवार यांनी महायुतीला पाठिंबा दिला, आणि विधानसभा क्षेत्रातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा त्यांनी सपाटा लावला, विशेष म्हणजे शहरातील सर्वात जुना आणि महत्वाचा बाबूपेठ उड्डाणपुलाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला.

महत्त्वाचे : चंद्रपुरात रेल्वे इंजिनचा अपघात

राजकारणात त्यांची चांगली प्रतिमा व वाढत असलेलं राजकीय वजन अनेकांना पचनी न पडल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशावर ब्रेकर लावण्याचे काम स्थानीक नेते करीत असल्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे, नेहमीप्रमाणे चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष जोरगेवार यांच्या पुढे डमी व कमकुवत उमेदवार उभा करतील अशी चिन्हे आहे. येत्या काही दिवसात भाजप प्रवेशावर विरोध करणाऱ्या स्थानिक नेत्याचा खरा चेहरा समोर येणारचं.

हद्दपारीची नोटीस, चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!