chandrapur bus stand : 12 कोटीच्या मुख्य बस स्थानकाला गळती

chandrapur bus stand चंद्रपूर – बल्लारपूर शहरात बस स्थानकाची गरज नसताना सुद्धा त्याठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून विमानतळासारखे बस स्टॅण्ड निर्माण करण्यात आले, त्यानंतर जिल्ह्यातील मुख्यालय चंद्रपूर शहरात सुद्धा नवे बस स्थानक पालकमंत्री मुनगंटीवार यांनी मंजूर केले, सदर बस स्थानकाचा एकूण खर्च हा 12 कोटी रुपयांचा होता, त्यानंतर काँक्रिटिकरणाला अडीच कोटी खर्च आला, आतापर्यंत एकूण 14 कोटी 50 लाख रुपये चंद्रपूर बस स्थानकाला खर्च आला मात्र उदघाटन पूर्वीच बस स्थानकाला गळती लागली.

महत्त्वाचे : वंचित आघाडी व भाजपला खिंडार

chandrapur bus stand चंद्रपुरात आज 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील बसस्थानकाची दुर्दशा उघडकीस आणली. बसस्थानकाच्या छतावरून पावसाचे पाणी टपकू लागले, त्यामुळे शेकडो प्रवाशांना अडचणीला सामोरे जावे लागले. विमानतळासारखी सुविधा देण्याचा दावा करत हे बसस्थानक अवघ्या काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आले.

बसस्थानकाची दुर्दशा

बसस्थानकाच्या छतावरून पावसाचे पाणी टपकल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. बसस्थानकात उभ्या असलेल्या लोकांना भिजण्यापासून वाचवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती. बसस्थानकाच्या कामावर शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले, मात्र त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे.या प्रकरणातून बसस्थानकाची दुर्दशा तर दिसून आलीच, शिवाय मॉडेल अंतर्गत उभारण्यात आलेल्या सरकारी प्रकल्पांतील भ्रष्टाचाराचारही उघडकीस आला. Chandrapur

चंद्रपूर मुख्य बस स्थानक

जनविकास सेनेची मागणी

बस स्थानका ला चारही बाजूनी गळती लागल्यानंतर काही प्रवाशांनी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांना फोन करून पाचारण केले. देशमुख यांनी जनविकास सेनेचे इमदाद शेख व अमोल घोडमारे यांच्यासह बसस्थानकाला भेट देऊन प्रवाशांसी संवाद साधला. बसस्थानकाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!