Stand up india scheme : काय आहे मार्जिन मनी योजना?

Stand up india scheme केंद्र शासनाच्या ‘स्टँडअप इंडिया’  योजनेंतर्गत महाराष्ट्राती अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरुणांना मार्जीन मनी उपलब्ध करून देण्याची योजना समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

Stand up india scheme महाराष्ट्र राज्यातील अनुसचित जाती, वनवबौध्द प्रवर्गातील सवलतीस पात्र 18 वर्षावरील नवउद्योजक तरुणांनी 10 टक्के स्व:हिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास ‘स्टँडअप इंडिया’ योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के हिस्सा अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

महत्त्वाचे : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने बाबूपेठ उड्डाणपुल होणार सुरू

        सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय 8 मार्च, 2019  व 9 डिसेंबर 2020 अन्वये शासन स्तरावरुन निश्चीत करण्यात आल्या आहेत. (Margin Money)

एसटीच्या ताफ्यात अडीच हजार बस

सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in  संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.  जिल्ह्यातील पात्र इच्छुक नवउद्योजक तरुणांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क साधावा व सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!