Dhamma chakra sohala : चंद्रपुरात 15 ते 16 ऑक्टोबर रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल

Dhamma chakra sohala चंद्रपूर शहरामधील दीक्षाभूमी मैदान येथे 15 व 16 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठया संख्येने येत असतात.

Dhamma chakra sohala यादरम्यान वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पारीत केले असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अवश्य वाचा : हजारो नागरिकांच्या उपस्थितीत निघाली महाकाली मातेच्या पालखीची शोभायात्रा

चंद्रपूर शहरातून दीक्षाभूमी परिसराकडे जाणाऱ्या रहदारीचा मार्ग 15 ऑक्टोबर 2024 चे सकाळी 8 वाजता पासून 17 ऑक्टोबर च्या सकाळी 8 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्याचा तसेच सर्व प्रकारच्या वाहनाची रहदारी वळवण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. Dhamma chakra sohala

अवजड वाहनाकरीता रहदारीचा मार्ग : नागपूरकडून चंद्रपूरकडे येणारी सर्व प्रकारची जड वाहने ही हॉटेल कुंदन प्लाझा येथून सीटीपीएस  मार्गे नेहरू नगर वरून मुल रोडला जातील. मुलकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने ही बंगाली कॅम्प – सावरकर चौक – वरोरा नाका उड्डाणपुल या मार्गाने जातील किंवा नेहरु  नगर वरून सीटीपीएस मार्गे नागपूरकडे जातील. तसेच गरजेनुसार एम.ई. एल. नाका चौक येथे सदर वाहने थांबवण्यात येतील. बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प – नेहरुनगर वरून सीटीपीएस मार्गे नागपूरकडे जातील किंवा पलीकडे बंगाली कॅम्प डी.आर. सी. बंकर, बायपास रोड येथे दीक्षाभूमी मार्गावरील गर्दी पाहून थांबवण्यात येतील. Dhamma chakra sohala

शहरातील दुचाकी व चारचाकी (हलकी) वाहनाकरीता रहदारी व्यवस्था : जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय, मित्रनगर चौक – टि.बी दवाखाना पर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरीता (सायकल सहीत)  बंद करण्यात येत आहे.पाण्याची टाकी –विश्रामगृह- जुना वरोरा नाका हा मार्ग सर्व प्रकारचे वाहनाकरीता (सायकल सहित) दोन्ही बाजुने बंद करण्यात येत आहे. करीता नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने (जड वाहने वगळून)  वरोरा नाका- उड्डान पुल –सिध्दार्थ  हॉटेल- बस स्टॅड- प्रियदर्शनी चौक मार्गे शहराकडे जातील. Diksha bhumi

रामनगर, मित्रनगर,आकाशवाणी, स्नेहनगर, वडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याची टाकी-दवा बाजार –संत केवलराम चौक- दाताळा रोड मार्गे पर्यायी रस्त्याने आपली वाहने (जड वाहने वगळून) घेवून जावीत. त्याचप्रमाणे जटपूरा गेटकडून रामनगर मार्गे जुना वरोरा नाकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने पाण्याची टाकी –प्रियदर्शनी चौक- बस स्टॅड-  सिघ्दार्थ हॉटेल- उड्डान पुल मार्गे नागपूरकडे जातील.

दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौध्द बांधवाची गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक- जुना वरोरा नाका ते आय.टी.आय. कॉलेज तसेच वरोरा नाका चौक – मित्रनगर चौक ते संत केवलराम चौक व मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत या सर्व परीसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. तसेच सदरचा सर्व परीसर “नो पार्कींग व नो हॉकर्स झोन” म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे निर्देशित काळात सदर परिसरात कोणतेही वाहने, हॉकर्स लावण्यात येवू नये. Diksha bhumi

दीक्षाभूमी, संत केवलराम चौक तसेच  दीक्षाभूमी ते जिल्हा स्टेडियम,  या दरम्यान राहण्याऱ्या रहिवाशांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजुला उभी न करता घोषित करण्यात आलेल्या पार्किंगमध्ये ठेवावीत.

आयटीआय कॉलेज ते जिल्हा स्टेडियमपर्यंत तसेच वरोरा नाका दर्ग्याच्या उजव्या बाजुने जाणरा रस्ता –पुठ्ठेवार हॉस्पीटल- बुक्कावार हॉस्पीटल- वरोरा नाका ते पिंक प्लॅनेट पर्यंत नो- पार्किंग झोन व नो- हॉकर्स झोन म्हणुन घोषित करण्यात येत आहे. 

दीक्षाभूमी सोहळयास येणाऱ्या नागरिकांकरीता वाहन पार्किंग स्थळ : 1.नागपूर रोडने दीक्षाभूमीकडे येणारे वाहनाकरीता शकुंतला लॉन, जनता कॉलेज पटांगण, जनता कॉलेज समोरील ईदगाह मैदान येथे वाहन पार्किंग स्थळ निश्चित करण्यात आले आहे. 2. शहराकडून दिक्षाभूमी कडे येणारे वाहनाकरीता सेंट मायकल स्कुल मैदान, सिंधी पंचायत भवन, न्यु इंग्लिश ग्राऊंड, 3. वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातून दीक्षाभूमीकडे येणारे वाहनाकरीता लोकमान्य टिळक हायस्कूल (जिल्हा स्टेडियमच्या मागे) जिवन साफल्य गृह निर्माण        सहकारी संस्था (मनोमय दवाखानच्या पाठीमागे) आणि 4. मुलरोड, बंगाली कॅम्प ,तुकूम या परिसरातून येणारे वाहनांकरीता कृषी भवन जवळील मैदान/ ट्रॅव्हल्स स्टॅन्ड येथे वाहन पार्किंग स्थळ ठरवून देण्यात आले आहे.

तरी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळयामध्ये सहभागी सर्व बौध्द बांधव /अनुयायी व जनतेने वरील वाहतूक  व्यवस्थेचा वापर करावा. तसेच ठरवून दिलेल्या पार्कींग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवून वाहतुक व्यवस्थेचे पालन करावे. शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!