Chandrapur School Theft मध्ये शाळेतील संगणक साहित्य चोरी

मुरलीधर बागला कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये 55 हजारांचे संगणक साहित्य चोरी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 10, 2026

चंद्रपूर: Chandrapur School Theft प्रकरणामुळे चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे. मुरलीधर बागला कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करून दोन कॉम्प्युटर रूममधील सुमारे 55 हजार रुपये किमतीचे संगणक साहित्य चोरून नेले. शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडून ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज असून चंद्रपूर शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (चंद्रपुरात परदेशी सिगारेटचा साठा जप्त)

चंद्रपूर शहरातील मुरलीधर बागला कॉन्वेन्ट हायस्कुलमध्ये चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत दोन विभागांच्या कॉम्प्युटर रूममधून ५५ हजार रुपये किमतीचे संगणक संच चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे .

Chandrapur School Theft प्रकरणात नेमके काय घडले?

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, बापट नगर येथील रहिवासी असलेले ५७ वर्षीय चरणदास परसराम राठोड हे स्थानिक मुरलीधर बागला कॉन्वेन्ट हायस्कुल येथे प्रिन्सीपल (प्राचार्य) पदावर कार्यरत आहेत . सध्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे कार्यालयातील कर्मचारी केवळ सकाळी ७:०० वाजता ते दुपारी ३:०० वाजेपर्यंतच कामकाजासाठी शाळेत उपस्थित असतात . विशेष म्हणजे या शाळेत दिवसपाळी किंवा रात्रपाळीसाठी कोणत्याही सुरक्षा रक्षकाची (सेक्युरिटी गार्ड) व्यवस्था केलेली नाही . सोमवार, ८ जून २०२६ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ७:०० वाजता सुर्यभान पडगेलवार यांनी ऑफिस उघडले होते आणि सर्व शिक्षकांनी दुपारी ३:०० वाजेपर्यंत कामकाज आटोपून शाळा बंद केली व ते आपापल्या घरी निघून गेले होते .

यानंतर, मंगळवार ९ जून २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजताच्या सुमारास शाळेतील कुस्ती खेळाचे इंचार्ज अलोक दुर्गम हे जेव्हा आपली रूम उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांना शेजारीच असलेल्या कॉम्प्युटर रूमचे टाळे तुटलेले अवस्थेत दिसले . त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती फोनवरून शाळेचे शिपाई राजू तानबाजी गेडाम यांना दिली . माहिती मिळताच राजू गेडाम आणि सचिन मोरे यांनी शाळेत धाव घेऊन पाहणी केली आणि ही बाब शाळेचे संस्थापक बागला साहेब तसेच दोन्ही विभागांच्या मुख्याध्यापकांना अवगत केली . घटनेची गांभीर्याने दखल घेत बागला चौकी पोलिसांना माहिती देण्यात आली, ज्यावरून पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली .

शाळेचे प्राचार्य व पोलीस कर्मचाऱ्यांनी आत जाऊन खोल्यांची बारकाईने पाहणी केली असता, प्राथमिक (प्रायमरी) विभागाच्या कॉम्प्युटर रूममधून अँसर (Acer) कंपनीचे टेबलवर ठेवलेले मॉनिटर, सीपीयू, की-बोर्ड आणि माऊस असा एकूण ३५ हजार रुपयांचा संगणक संच गायब असल्याचे दिसून आले . तसेच हायस्कुल विभागाच्या कॉम्प्युटर रूममधून २० हजार रुपये किमतीचे १ मॉनिटर आणि १ सीपीयू चोरट्याने लंपास केले होते . चोरट्याने ८ जूनच्या दुपारी ३:०० वाजेपासून ते ९ जूनच्या सकाळी ७:०० वाजेदरम्यानच्या कालावधीत बंद शाळेचे कुलूप तोडून एकूण ५५ हजार रुपये किमतीचे हे संगणक साहित्य चोरून नेल्याचे निष्पन्न झाले .

या प्रकरणी शाळेचे प्राचार्य चरणदास परसराम राठोड यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात हजर राहून तोंडी तक्रार दाखल केली . त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५(e), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे . चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक निशिकांत सुरेंद्र रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील सखोल तपास पोलीस हवालदार संजय दिवाकर धोटे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे .

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment