New cricket kit : सुधीरभाऊ युथ क्लबद्वारे क्रिकेट संघांना १८५ किटचे वितरण

cricket kit बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा या भागातील खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याची क्षमता आहे. फक्त या खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझा सदैव तोच प्रयत्न राहिला आहे. या भागातील क्रिकेटपटूंना सर्व सुविधा, उत्तम प्रशिक्षण आणि मोठ्या संधी उपलब्ध करून देण्याचा मी सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. Sudhir mungantiwar

cricket kit सुधीरभाऊ युथ क्‍लब बल्लारपूरद्वारे आयोजित क्रिकेट स्‍पर्धेत सहभागी झालेल्या संघांना ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते किटचे वितरण करण्यात आले. क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या १८५ संघांना किट वितरण करण्यात आल्या. यावेळी भाजपा नेते चंदन सिंग चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश भैय्या, मनिष पांडे, रणन्जय सिंग, येलया दासरफ, राजेश दासरवार, सतिश कनकम, प्रमोद रामीलावार, अब्दुल आबिद, पिंटु देउळकर, मनोज खेंगर, बबलु गुप्ता, प्रभदिप सचदेवा, आशिष चावडा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यातील 19 ओबीसी जातींचा केंद्रीय सूचित समावेश

महत्त्वाचे : चंद्रपूर शहरातील हाय-फाय ऑटो स्टॅण्ड

या कार्यक्रमात ना. श्री. मुनगंटीवार यांनी खेळाडूंसोबत संवाद साधला. ते म्हणाले, ‘आपल्या येथील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आले. त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर ते आकाशाला गवसणी घालतील असा मला ठाम विश्वास आहे. मिशन शौर्यच्या निमित्ताने मी एक प्रयत्न करून बघितला. आदिवासी समाजातील १७-१८ वर्षाचे तरुण, ज्यांनी कधी प्रत्यक्ष विमान बघितले नाही, जे कधी विमानात बसले नाही, त्यांनी आठ महिन्यांच्या प्रशिक्षणात एव्हरेस्टवर २९ हजार २९ फुटांवर चंद्रपूर जिल्ह्याचा झेंडा रोवला. या कामगिरीचे विश्वगौरव,पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देखील कौतुक केले. त्यामुळे आपल्या येथील क्रिकेटपटूंना थोडी संधी दिली, व्यासपीठ दिले आणि उत्तम प्रशिक्षण मिळाले, तर ते देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी करू शकतील.’ cricket kit

मतदारसंघाला पुढे नेताना रस्ते, कॉलेज, पाणीपुरवठा, विद्यापीठ, बस स्टॅण्ड, पोलिस स्टेशन अशा सर्व सुविधा होत आहेत. त्या आवश्यकही आहेत. पण त्याचवेळी खेळाच्या मैदानावर देखील माझ्या मतदारसंघातील तरुण पुढे गेले पाहिजेत, असाही माझा आग्रह आहे. त्यासाठी मी संकल्पच सोडला आहे, असेही त्यांनी नमूद केले. १ ते १२ जानेवारी या कालावधीत क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चंद्रपूर, मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर येथे ही स्पर्धा होईल. ग्रामीण भागातील खेळाडू यात सहभागी होतील.१ लक्ष रुपये प्रथम पुरस्कार असणार आहे. आता फक्त पुढील ९० दिवस मैदानांमध्ये चांगली तालीम करा.जे खेळाडू उत्तम कामगिरी करतील त्यांना चांगली संधी मी उपलब्ध करून देईल, असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला.

अवश्य वाचा : महाकाली महोत्सवाचा समारोप

एम फॉर मुल, बी फॉर बल्लारपूर, पी फॉर पोंभुर्णा!
मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये माझे मित्र आमदार आशीष शेलार पदाधिकारी आहेत. त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. आपल्या येथील चांगल्या खेळाडूंना कशी संधी देता येईल, यावर विचार होणार आहे. त्यांना मी सांगितले आहे की, ‘एम फॉर मुंबईच नाही तर एम फॉर मुल, पी फॉर पुणेच नाही तर पी फॉर पोंभुर्णा आणि बी फॉर बारामतीच नाही तर बी फॉर बल्लारपूरचाही विचार नक्कीच व्हायला पाहिजे.’ cricket kit

गावसकर, तेंडुलकर, रोहित शर्मा घडतील
बल्लारपूरमधील स्टेडियम छान झाले आहे. आता तर क्रिकेट अकादमी तयार करण्याचा विचार करतो. भविष्यात या मतदारसंघातील क्रिकेटपटू सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा होईल, तो दिवस फार लांब नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!