Today Political childishness : आचारसंहिता लागण्यापूर्वी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील ‘राजकीय बालिशपणा”

Political childishness 15 ऑक्टोबर पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, मात्र आचारसंहिता लागू होण्यापूर्वी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात राजकीय बालिशपणाचे उदाहरण बघायला मिळाले.

Political childishness विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरात अनेक विकासकामे करण्यासाठी निधी खेचून आणला, वाचनालय असो की बाबूपेठ उड्डाणपूल, तसेच दिक्षाभूमि व वढा तीर्थक्षेत्र यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करीत भूमिपूजन व काम पूर्णत्वास नेले.

महत्त्वाचे : मजूर काम करण्यासाठी गेला आणि रोटाव्हॅटर मशीनमध्ये अडकला

मात्र आचारसंहिता लागण्यापूर्वी विधानसभा क्षेत्रात भाजप विरुद्ध जोरगेवार असा सामना पुन्हा रंगला आहे, त्याच उदाहरण म्हणजे बाबूपेठ उड्डाणपूल नागरिकांसाठी वाहतुकीसाठी सुरू करणे, एकदिवस आधी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी आमदार जोरगेवार हे बाबूपेठ उड्डाणपुलाची पाहणी करण्याकरिता गेले आणि दुसऱ्या दिवशी हा उड्डाणपूल नागरिकांसाठी सुरू करू अशी घोषणा करीत ते निघून गेले होते. Political childishness

मात्र 9 ऑक्टोबर रोजी भाजपचे ब्रिजभूषण पाझारे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह बाबूपेठ उड्डाणपूलावर बँड बाजा लावत सदर उड्डाणपूल नागरिकांसाठी सुरू केला, मात्र दुसऱ्या दिवशी आमदार जोरगेवार हजारो नागरिकांसह उड्डाणपूलावर पोहचत म्हणण्याप्रमाणे उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू केला, 15 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उड्डाणपूलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच अधिकृतपणे नाव दिलं.

गुन्हेगारी : चंद्रपूर शहरात जुन्या वादातून युवकाची हत्या, 2 तासात आरोपीना अटक

15 ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागणार होती, तत्पूर्वी विधानसभा क्षेत्रातील भूमिपूजन काम संपन्न होत होते, त्यामध्ये 25 कोटी निधी हा वढा तीर्थक्षेत्र साठी आमदार जोरगेवार यांनी मंजूर केला होता, 15 ऑक्टोबर रोजी त्याबाबत भूमिपूजन कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला, मात्र त्याठिकाणी सकाळी भाजपचे ब्रिजभूषण पाझारे आपल्या समर्थकासह तिथं पोहचत भूमिपूजन उरकून टाकले, त्यांनतर नियोजित वेळेत आमदार जोरगेवार यांनी अधिकृतपणे भूमिपूजन कार्यक्रम पार पाडला. Political childishness

दोन्ही ठिकाणी भाजप नेते पाझारे यांनी हा प्रकार करीत स्वतःवर अनेकांची नाराजगी ओढवून घेतली, चंद्रपूर जिल्हा व संपूर्ण राज्यात सुधीर मुनगंटीवार यांची मातब्बर राजकारणी म्हणून ओळख आहे, अनेकदा ते मुख्यमंत्री पदाचे दावेदारी म्हणून त्यांचं नाव चर्चेत आलं होतं, लोकसभा निवडणुकीत त्यांचा 2 लाख 60 हजार मतांनी पराभव झाला. सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते असे तत्पर असते तर मुनगंटीवार यांना पराभवाचे तोंड बघावे लागले नसते, जर मुनगंटीवार लोकसभेत खासदार म्हणून विराजमान झाले असते तर जिल्ह्यात विकासाची लाट नक्कीचं आली असती. Political childishness

मुनगंटीवार यांचं राजकीय क्षेत्रात मोठं नाव असताना त्यांचे कार्यकर्ते म्हणून पाझारे यांनी केलेला प्रकार राजकीय पोरकटपणाचे एक लक्षण आहे अशी चर्चा सध्या विधानसभा क्षेत्रात रंगली आहे, आज किशोर जोरगेवार हे सामान्य नागरिकांचे आधार बनले आहे, त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे पूर्णत्वास आली.

आज भाजप तर्फे ब्रिजभूषण पाझारे हे विधानसभा निवडणुकीत जोरगेवार यांच्यापुढे आव्हान निर्माण करतील अशी चिन्हे आहे, पण पाझारे हे अजूनही नागरिकांच्या मनात घर करू शकले नाही आहे.

ऑक्टोबर महिन्यांतच विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, तत्पूर्वी चंद्रपुरात अनेक राजकीय भूकंप आपल्याला बघायला मिळणार आहे, मात्र सध्यातरी आचारसंहिता लागण्यापूर्वीचा राजकीय बालिशपणा नागरिकांनी आधीच बघितला आहे.

क्रमश…..

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!