Chandrapur Bjp Worker आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करून महायुतीतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत असून शहरी भागासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी प्रचारात पुढाकार घेत बैठकींचा तडाखा लावला आहे.
राजकीय : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदभरतीचा घोळ, आरोप प्रत्यारोप
Chandrapur Bjp Worker या बैठकींना नागरिकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काल पार पडलेल्या बैठकांमध्ये भाजपचे चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, तालुका अध्यक्ष नामदेव डाहुले, भाजप नेते अनिल डोंगरे, महिला आघाडी अध्यक्ष सविता कांबळे, भाजपचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, राकेश पिंपळकर, विजय बलकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विधानसभा निवडणुकीची रंगत आता वाढू लागली असून सर्वच पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांनी प्रचारात चांगली आघाडी घेतली असून मतदारसंघातील शहरी भागासह ग्रामीण भागातही बैठकांचे सत्र सुरू केले आहे. Chandrapur Bjp Worker
गुन्हेगारी : सावधान, सोनं खरेदी करताय तर मग ही बातमी वाचा
भाजप कार्यकर्ते निवडणुकीत स्वतःला झोकून देत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत अनेक बैठकांमध्ये योग्य ते मार्गदर्शन केले आहे, परिणामी भाजप कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागल्याचे दिसत आहे.
दरम्यान, शहरातील भिवापूर वार्ड येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांशी संवाद साधला. तर मोरवा, येरुर, साखरवाही येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकींनाही आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले आणि हा उत्साह मतदानाच्या दिवसापर्यंत कायम ठेवण्याचे आवाहन केले.
भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने कामाला लागला आहे. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण मोठा निधी उपलब्ध करून देत दिला असून यातून येथे मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पुढेही ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासाचा संकल्प आपला आहे. पक्षाचा विचार आणि आपली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम आमचा प्रत्येक कार्यकर्ता करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकींना ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.