Tiger Attack Chandrapur घटनेनंतर नागभीड परिसरातील जंगलात वनविभाग आणि ग्रामस्थ घटनास्थळी पाहणी करतानाचे दृश्य.

Tiger Attack Chandrapur । नागभीडमध्ये वाघाचा हल्ला; तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 19, 2026

Tiger Attack Chandrapur : नागभीड (चंद्रपूर) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला असून २० दिवसानंतर वाघाच्या हल्ल्याने जिल्हा हादरला असून जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करीत ठार केल्याची घटना १९ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. वर्ष २०२६ मधील हि १५ वि घटना आहे. मृत महिलेचे नाव ५५ वर्षीय वनिता शंकर उईके आहे. (पती-पत्नी एकत्रीकरण धोरणाची अंमलबजावणी रखडली)

नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा परिसरात Tiger Attack Chandrapur

नागभीड तालुक्यातील मौजा किटाळी मेंढा मधील काही महिला गावाजवळील जंगलात कक्ष क्रमांक 69 मध्ये तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या, तेंदूपत्ता संकलन करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने वनिता उईके यांच्यावर हल्ला केला, महिलांनी आरडाओरडा केला असता वाघाने उईके यांना फरफटत जंगलाच्या दिशेने नेले, गावकऱ्यांना याबाबत माहिती मिळाली, वनविभागाची चमू घटनस्थळी दाखल झाली, महिलेचा जंगलात शोध घेण्यात आला असता काही अंतरावर छिन्नविछिन्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. काही काळ गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. नागभीड पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. Tiger Attack Chandrapur

मृतदेहाचा पंचनामा करीत उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले, घटनेनंतर गावकऱ्यांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे केली. वर्ष २०२६ मध्ये मानव वन्यजीव संघर्षात एकूण १५ नागरिकांचा बळी गेला, ज्यामध्ये एकाचा बिबट्याच्या हल्ल्यात तर १४ नागरिकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment