illegal tobacco supply chain chandrapur
illegal tobacco supply chain chandrapur : चंद्रपूर ३ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा व्यवसाय जोमात सुरु आहे मात्र हे सर्व प्रशासनाच्या समोर होत असताना सुद्धा यावर कारवाई करण्याचं साधं धाडस प्रशासन तर्फे दाखविल्या जात नाही. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर व चंद्रपूर शहर मधून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची वाहतूक केल्या जाते. या सर्व अवैध व्यवसायाची चौकशी व्हावी याकरिता उच्चस्तरीय समिती नेमावी यासाठी सामाजिक समता संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी गौडा यांना निवेदन देण्यात आले.
Also Read : २२ डिसेम्बर रोजी चंद्रपुरात कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण
चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाकू (गुटखा/पान मसाला) चा अवैध व्यवसाय उघडपणे फोफावत असून, यामुळे ओरल कॅन्सरची साथ वेगाने वाढत आहे. हा धंदा FSSAI कायदा २००६, COTPA २००३ आणि महाराष्ट्र गुटखा बंदी २०१२ चा थेट भंग करतो. जिल्हा रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २ वर्षांत ओरल कॅन्सर रुग्णांत २५% वाढ झाली असून, यातील ६०% रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. टीनएजर्स आणि युवक गुटख्याच्या व्यसनात सर्वाधिक अडकले असून, शाळा-कॉलेज परिसर, बसस्टँडवर २० रुपयांत गुटखा सहज उपलब्ध होतो. १५-१९ वयोगटातील मुले ओरल कॅन्सरच्या मार्गावर आहेत. illegal gutkha trade Chandrapur
खुलेआम चालतो हा धंदा
हा अवैध धंदा अपराधी तत्त्वांनी चालवला जातो, ज्यात तस्करी, करचोरी आणि माफिया नेटवर्क सामील आहे. पोलीस व औषध प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा कारोबार गल्ली-चौराह्यावर खुलेआम चालतो. नाममात्र कारवाई फक्त चिल्लर विक्रेत्यांवर होते, तर मुख्य सप्लायर आणि माफिया मोकाट राहतात, ज्यामुळे प्रशासनावर संशय निर्माण होतो. अधिवक्ता प्रीतीशा शाह यांनी जिल्हाधिकारी श्री विनय गौडा (आयएएस) यांना निवेदना द्वारे उच्चस्तरीय चौकशी समिती तात्काळ स्थापन करण्याची मागणी केली आहे.
समितीचे उद्देश: अवैध व्यवसायाचे मूळ कारण, सप्लाय चेन आणि संरक्षण देणारे घटक शोधणे. मुख्य सप्लायर, डिस्ट्रीब्यूटर, गोदाम मालक आणि तस्करी नेटवर्कचे मास्टरमाइंड यांची ओळख पटवणे. कालबद्ध अहवाल सादर करणे.
कारवाई केवळ पान ठेले किंवा छोटे विक्रेते यांच्यापुरती मर्यादित नसावी. हा धंदा थांबला नाही तर हजारो कुटुंबे उध्वस्त होतील आणि चंद्रपूरला “कॅन्सर फ्री जिल्हा” बनवण्याची संधी हातची जाईल
निवेदन देतांना सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहम्मद इरफ़ान शेख अधिवक्ता प्रीतिशा शाह सचिव धीरज तामगड़े व समिति चे सदस्य उपस्थित होते.










