Congress stance on road divider corruption । विकासाच्या नावाखाली सुरु असलेल्या भ्रष्टाचाराला कांग्रेसचा विरोध – रामू तिवारी

Congress stance on road divider corruption

Congress stance on road divider corruption : चंद्रपूर : बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत सुरू असलेल्या रस्ता व दुभाजकाच्या वादग्रस्त कामावर काँग्रेस ने स्पष्ट भूमिका मांडली आहे. “विकास कामांना विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराला विरोध आहे, अशी भूमिका काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केली आहे.

Also Read : चंद्रपूर मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची फाईल तयार

बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत रस्त्याचे बांधकाम व्हावे, यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने यापूर्वी देखील आंदोलन करण्यात आले होते.  महाकाली प्रभागातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका कल्पना लहामगे यांनी या दुभाजक कामातील गैरव्यवहारांविरोधात महानगरपालिका आयुक्तांना लेखी तक्रार सादर केली आहे.

अव्वाच्या सव्वा दराने दुभाजक बांधण्याचे कंत्राट

रस्त्याऐवजी अव्वाच्या सव्वा दराने दुभाजक बांधण्याचे ठेके देण्यात आले असून, हे सार्वजनिक निधीचा अपव्यय असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. माजी नगरसेविका लहामगे यांनी दिलेले पत्र हीच काँग्रेसची अधिकृत भूमिका असल्याचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. 


तिवारी यांनी म्हटले की, मर्जीतल्या कंत्राटदाराला लाभ देण्यासाठी मनपाचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले, तर कंत्राटदाराला तितकाच फायदा झाला. कामाची गुणवत्ता शून्य असून जनतेच्या पैशांची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. काँग्रेसने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अभियंते, कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment