वरोरा पोलीस स्टेशन पुन्हा चर्चेत

News34

चंद्रपूर /वरोरा – 7 ऑगस्ट ला अत्याचारग्रस्त महिलेने वरोरा पोलीस स्टेशनच्या आवारात विष प्राशन करीत खळबळ माजवून टाकली होती, त्या घटनेनंतर 8 ऑगस्ट ला पुन्हा एका महिलेने पोलीस स्टेशनच्या आवारात विष प्राशन केल्याची घटना घडली मात्र त्या महिलेने बनाव केल्याचे उघडकीस आले.

वरोरा तालुक्यातील 48 वर्षीय अर्चना दिवाकर दिवटे ही महिला सायंकाळच्या सुमारास वरोरा पोलीस स्टेशनमध्ये पोहचली, आमच्या शेतात चाफले नामक व्यक्तीने खांब लावले त्यांच्यावर कारवाई करावी याबाबत 4 दिवस आधी तक्रार दिली होती, मात्र त्याच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याने ती महिला आज विष सोबत घेत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली, शौचाच्या बहाण्याने त्या महिलेने पिशवीतून बॉटल काढत तिने विष प्राशन केले.
अचानक झालेली ही घटना बघून पोलीस विभाग सतर्क झाले.

तात्काळ त्या महिलेला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्या महिलेने तपासणी करण्यासाठी आलेल्या डॉक्टरला रोखले, पोलिसांना संशय आला असता त्यांनी त्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना विचारणा केली असता आम्ही कालच्या घटनेला प्रेरित होऊन हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.

सदर माहिती मिळाल्यावर पोलिसही अवाक झाले, याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांनी माहिती दिली की सदर महिलेच्या प्रकरणात पोलिसांची कसलीही भूमिका नव्हती, रुग्णालयात गेल्यावर जेव्हा त्या महिलेने डॉक्टरला तपासणी करू दिली नाही तेव्हा आम्हाला संशय आला होता, विशेष म्हणजे पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही मध्ये संपूर्ण घटनाक्रम कैद झाला आहे.

पिशवीत जी बॉटल त्या महिलेने आणली होती त्यामध्ये काही नव्हते, सध्या त्या महिलेला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
त्या महिलेने हा बनाव का केला याबाबत तपास करीत रीतसर कायदेशीर प्रक्रियेने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नोपाणी यांनी दिली

वरोरा पोलीस उपविभागात भापोसे sdpo म्हणून आयुष नोपाणी हे रुजू झाल्यावर त्यांनी अनेकांवर कारवाईचा धडाका लावला होता, सध्या वरोरा येथील सर्व अवैध धंद्यावर नोपाणी यांनी चाप बसविला आहे.

त्यांच्या प्रामाणिक भूमिकेला काहीजण विरोध करीत पोलीस विभागाला बदनाम तर करीत नाही ना अशी चर्चा सध्या जनमानसांत सुरू आहे.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!