झपाट्याने वाढत असलेल्या डोळ्यांच्या साथीवर उपाययोजना करा

News34

 

चंद्रपूर:- जिल्ह्यांमध्ये डोळ्यांचा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत असून डोळे येवून डोळे सूजने या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व प्रशासनमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गांवस्तरावर प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यासंदर्भात शिवसेनेचे वैद्यकीय जिल्हा प्रमुख, अरविंद धिमान व शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख, संतोष पारखी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सोनारकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

महाराष्ट्रासह विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये डोळ्याचा संसर्गजन्य रोग म्हणजेच डोळे येणे याचा खूप प्रादुर्भाव झालेला दिसत असून आपल्या जिल्ह्यात सुद्धा अनेक व्यक्तींना हा रोग झालेला मोठ्या प्रमाणात आढळत आहे. यावर आळा बसवण्यासाठी व त्या संसर्गजन्य रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व प्रशासनमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गांवस्तरावर युद्ध पातळीवर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करुन जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना या आजारापासून दूर ठेवण्यास प्रयत्न करावे.

आजच्या स्थितीत खेडोपाडी या आजारावर इलाज होत नसून शासनामार्फत गोरगरिबांना याचा लाभ मिळावा या हेतूने आपण प्रयत्नशील आहात तसेच आपण संबंधितांना यासंदर्भात तात्काळ आदेश देवून ह्या आजारापासून नागरिकांना बाहेर काढण्यास मदत करावी.

यावेळी शिवसेनेचे वैदकीय जिल्हा प्रमुख, अरविंद धिमान, शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख, संतोष पारखी, कोरपना तालुका प्रमुख, राकेश राठोड, उपतालुका प्रमुख, अविनाश उके, राजू रायपुरे, आशिष खरोले व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!