चंद्रपूर : Chandrapur Ayushman Bharat Camp अंतर्गत चंद्रपूर शहरात सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आयुष्मान कार्ड नोंदणी व वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार Pratibha Dhanorkar यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राधा पुलगमकर यांच्या आयोजनात हे शिबिर 15 जून ते 20 जून 2026 दरम्यान आयोजित केले आहे. या शिबिरातून पात्र कुटुंबांना 5 लाखांपर्यंत व ज्येष्ठ नागरिकांना 10 लाखांपर्यंत आरोग्य विमा मिळणार आहे. चंद्रपूरमधील रेशनकार्ड धारक नागरिकांसाठी ही मोठी आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. (चंद्रपुरात १५३ नागरिकांनी केले रक्तदान)
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा आणि त्यांना मोफत वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर शहरात एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राधा पुलगमकर यांच्या आयोजनात शहरात भव्य ‘आयुष्मान भारत कार्ड वितरण व नोंदणी शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सोमवार, दिनांक १५ जून ते २० जून २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत राधा पुलगमकर यांचे संपर्क कार्यालय, अभ्यंकर शाळेजवळ, विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे.
Chandrapur Ayushman Bharat Camp चे उद्दिष्ट
या शिबिराच्या माध्यमातून पात्र सर्वसामान्य कुटुंबांना प्रति कुटुंब ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा, तर ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष १० लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारीय विम्याचे कवच उपलब्ध करून दिले जाणार असून क्षेत्रातील सर्व रेशनकार्ड धारक नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी येताना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड, चालू असलेले रेशनकार्ड ज्यावर १२ अंकी नंबर असणे बंधनकारक आहे आणि आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर तो फोनसह सोबत आणणे अनिवार्य आहे.
या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून स्थानिक महसूल विभाग, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तांत्रिक व प्रशासकीय सहकार्यासाठी अधिकृत पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरातील सर्व रेशनकार्ड धारक नागरिकांनी, गरजू कुटुंबांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपले ‘आयुष्मान कार्ड’ काढून घेऊन आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






