Free Health Camp अंतर्गत चंद्रपूरमध्ये आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिरात नागरिकांची तपासणी करताना डॉक्टर.

free health camp । आर्थिक अडचणींमुळे कुणीही उपचारांपासून वंचित राहू नये : जोरगेवार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 17, 2026

free health camp : चंद्रपूर – सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देणे हीच खरी लोकसेवा असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, आर्थिक परिस्थितीमुळे कुणीही उपचारांपासून वंचित राहू नये आणि गंभीर आजारांचे वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने आयोजित भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिरात ते बोलत होते. (तो गोषवारा, सतर्क रहा)

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तसेच भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), सामान्य रुग्णालय चंद्रपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी बाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर बायपास रोडवरील के.जी.एन. कॉन्व्हेंट येथे भव्य “सर्वरोग निदान व उपचार शिबिर” आयोजित करण्यात आले होते. यावेळी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विभागप्रमुख डॉ. शशांक बोथरकर, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष रघुवीर अहिर, महामंत्री श्याम कनकम, सविता दंढारे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, वंदना हातगावकर, तुषार सोम, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, सायली तोंडरे, गणेश गेडाम, दिवाकर पुडट्टवार, निलिमा वनकर, के.जी.एन. कॉन्व्हेंटचे संस्थापक महेमुद शेख, विमल कातकर आदींची उपस्थिती होती.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची विविध आजारांवर free health camp तपासणी

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज आयोजित करण्यात आलेले हे “भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिर” हे केवळ एक आरोग्य शिबिर नसून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजेत. आर्थिक परिस्थितीमुळे कुणीही उपचारांपासून वंचित राहू नये, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. free health camp

आज सर्वसामान्य कुटुंबांना मोठमोठ्या आजारांच्या उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा तपासण्या, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया यांचा खर्च परवडत नसल्यामुळे रुग्ण उपचार घेण्यास उशीर करतात. यामुळे आजार अधिक गंभीर होतात. हीच बाब लक्षात घेऊन विविध तज्ज्ञ डॉक्टरांना एकत्र आणत हे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. free health camp

या शिबिरामध्ये मेडिसिन, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा तसेच शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, मोतीबिंदू, हर्निया, महिलांचे आजार, सांधेदुखी, त्वचारोग यांसारख्या अनेक आजारांवर मोफत तपासणी व उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे गरज असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार आहेत. गरीब व गरजू नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळावा, हा यामागचा मुख्य हेतू आहे. एक्स-रे, रक्त तपासणी, लघवी चाचणी, सोनोग्राफी तसेच आवश्यकतेनुसार सीटी स्कॅन व एमआरआय तपासण्यादेखील मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ही सेवा सामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे ते म्हणाले. free health camp

काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अनेक बालकांच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. त्यापैकी काही बालकांना मुंबई येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे. त्या चिमुकल्यांमध्ये अवघ्या पाच व सहा महिन्यांच्या बालकांचाही समावेश आहे. त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता उत्तम आहे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी हजारो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment