house burglary case : गोंडपिपरी: तालुक्यातील शिवाजी चौक परिसरामध्ये घडलेल्या एका धाडसी घरफोडीच्या गुन्ह्याचा गोंडपिपरी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास लावला आहे. घर बंद असल्याचे पाहून अज्ञाताने घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर हात साफ केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गणपूर येथील २१ वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. (चंद्रपुरातील रिलॅक्स हॉटेलवर गुन्हे शाखेची धाड)
या संदर्भातील सविस्तर माहिती अशी की, शिवाजी चौक, गोंडपिपरी येथील रहिवासी ५४ वर्षीय सुधाकर बिजाराम आलाम यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. १० मे रोजी त्यांच्या घरी कोणीही नसताना अज्ञात चोराने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात ठेवलेल्या टिनाच्या पेटीतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, असा एकूण १ लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला होता. या घरफोडीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. house burglary case
house burglary case सोन्याचे दागिने आणि मोबाईल पोलिसांनी केले जप्त
गोंडपिपरी पोलिसात या घटनेची तक्रार प्राप्त होताच, पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गणपूर येथील २१ वर्षीय संशयित करण भालचंद्र आलाम याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या करणने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. house burglary case
पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेली सोन्याची नथ, सोन्याचे मंगळसूत्र आणि चांदीचे जोडवे जप्त केले. याशिवाय, चोरीच्या पैशांमधून त्याने स्वतःसाठी खरेदी केलेले दोन महागडे मोबाईल फोन देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या या संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ३७ हजार रुपये आहे.
सदरची उल्लेखनीय आणि यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलीस कर्मचारी प्रशांत नैताम आणि प्रवीण कदम यांनी केली. पोलिसांच्या या तत्पर कामगिरीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






