Fake Job Recruitment संदर्भात चंद्रपूर मनपा भरतीबाबत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करणारी माहिती.

fake job recruitment | चंद्रपूर मनपा नोकरभरतीचा ‘तो’ तक्ता बनावट; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे तरुणांना सतर्क राहण्याचे आवाहन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 17, 2026

fake job recruitment : चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांचा एक तक्ता सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या तक्त्यामुळे मनपामध्ये मोठी नोकरभरती सुरू असल्याचा संभ्रम निर्माण झाला असून, सुशिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तात्काळ दखल घेत, सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण, नागरिक आणि पालकांना सतर्क राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे. (चंद्रपुरात नवे पोलीस अधीक्षक कार्यालय)

खासदार धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा तक्ता म्हणजे कोणतीही नवीन नोकरभरतीची अधिकृत जाहिरात नाही. तो केवळ महानगरपालिकेच्या प्रशासकीय माहितीचा एक गोषवारा (माहिती पत्रक) आहे. मनपा प्रशासनाने सद्यस्थितीत अशी कोणतीही नवीन भरती प्रक्रिया सुरू केलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी अर्ज मागवलेले नाहीत. त्यामुळे तरुणांनी या केवळ माहितीच्या तक्त्याला अधिकृत जाहिरात समजू नये. fake job recruitment

चंद्रपूर मनपा भरतीच्या fake job recruitment व्हायरल यादीमागील सत्य काय?

काही गैरप्रवृत्तीचे लोक किंवा दलाल या व्हायरल यादीचा गैरवापर करून मनपामध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सुशिक्षित तरुणांची आर्थिक फसवणूक करण्याची दाट शक्यता आहे. अशा खोट्या आमिषांना, आश्वासनांना आणि पैशांच्या बेकायदेशीर मागणीला नागरिकांनी आणि तरुणांनी अजिबात बळी पडू नये, असे खासदार कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. fake job recruitment

जर नोकरीच्या नावावर कोणी पैशांची देवाणघेवाण करत असेल किंवा फसवणुकीचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यास, नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. कोणत्याही अनधिकृत किंवा सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. केवळ अधिकृत शासकीय संकेतस्थळावर (Website) किंवा मुख्य वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या शासकीय जाहिरातींनाच प्रामाणिक आणि खरे मानावे. स्वतःची आर्थिक आणि मानसिक फसवणूक टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे आणि ही महत्त्वाची माहिती इतर गरजू मित्रांपर्यंत आणि सोशल मीडिया ग्रुप्सवर शेअर करून जनजागृती करावी, असे आवाहन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment