Chandrapur Mitra Nagar Murder घटनेनंतर तपास करताना रामनगर पोलीस

चंद्रपूरच्या मित्रनगर चौकात वादातून ४८ वर्षीय व्यक्तीची हत्या; रामनगर पोलिसांनी २४ तासांत आरोपीला केली अटक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 26, 2026

चंद्रपूर – Chandrapur Mitra Nagar Murder प्रकरणात चंद्रपूर शहरातील मित्रनगर चौकात ४८ वर्षीय संतोष भेंडे यांची हत्या झाली. रामनगर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि विशेष पथकाच्या मदतीने अवघ्या २४ तासांत आरोपी अजय उर्फ ॲप्पल पोहनकर याला अटक केली. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हा गुन्हा घडल्याचे समोर आले आहे. (जटपुरा गेट [परिसरातील इटनकर पान ठेल्यावर एमडी पावडरची विक्री)

२५ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास शहरातील मित्र नगर चौकात ४८ वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना घडली, माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मृतदेहाचा पंचनामा करीत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतकाचे ओळख पटवीत पोलिसांनी २४ तासाच्या आत एकाला अटक केली आहे. मृतकाचे नाव संतोष अरुण भेंडे राहणार पाला जिल्हा अमरावती असे आहे.

शहरातील मित्र नगर चौकात २५ जून ला रात्री १० वाजताच्या सुमारास ४८ वर्षीय संतोष भेंडे हा रस्त्याने जात होता, त्यावेळी दुचाकीवर आलेल्या १९ वर्षीय तरुणाने संतोष सोबत वाद घातला, वाद इतका वाढला कि दोघांमध्ये किरकोळ हाणामारी झाली. या हाणामारीत तरुणाने संतोष वर हाताबुक्क्याने व दगडाने मारहाण केली. यामुळे संतोषच्या डोक्यावर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी चौगुले व पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके हे घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी मृतकाचे ओळख पटवली. गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरविल्यावर १९ वर्षीय अजय उर्फ ऍप्पल शंकर पोहनकर ला या प्रकरणी अटक केली.

Chandrapur Mitra Nagar Murder प्रकरणात २४ तासांत आरोपी अटक

मिळालेल्या माहितीनुसार मृतकाचे आरोपीच्या आईसोबत अनैतिक संबंध होते, मागील २ वर्षांपासून मृतक संतोष हा आपल्या साबळे या नातेवाईकाच्या घरी सतत येत होता, यादरम्यान त्याची ओळख अजय च्या आईसोबत झाली, हळूहळू ओळखी हि प्रेमात रूपांतर झाली. आरोपी व मृतकाच्या नातेवाईकाचे घर शेजारी होते. आई व संतोष च्या या संबंधाची चाहूल अजयला लागताच त्याने संतोष ला गाठत त्याच्यासोबत वाद घातला. वाद विकोपाला गेला आणि हाणामारीत संतोष चा मृत्यू झाला, हा गुन्हा अनैतिक संबंधातुन झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एकुरके यांनी दिली.

घटनेच्या ठिकाणी अंधार असल्याने सीसीटीव्ही मध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट नव्हता त्यामुळे पोलिसांनी या आव्हानात्मक गुन्ह्याची तांत्रिक बाजू तपासत आरोपीची ओळख स्पष्ट केली. आरोपीच्या शोधात पोलिसांनी पथके तयार केली. अजय हा वडगाव परिसरात आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीला वडगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले. गुन्हा का केला याबाबत आरोपीने कबुलीजबाब दिला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि शिवाजी नागवे, सपोनि हनुमान उगले, पोउपनि कृष्णा दराडे, आनंद खरात, शरद कुडे, जितेंद्र आकरे, राम नैताम, बाबा नैताम, पंकज, प्रकाश मडावी, संदीप गेडाम, प्रफुल पप्पूलवार, सुरेश कोरवार, मनीषा मोरे, ब्ल्यूटी साखरे यांनी केली.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment