Chandrapur Warkari Compensation approved by Maharashtra government

चंद्रपूर येथील मृत वारकरी कुटुंबाला ४ लाखांची मदत मंजूर; आमदार जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 5, 2026

चंद्रपूर – आषाढी वारीदरम्यान अपघाती मृत्यू झालेल्या वारकऱ्याच्या कुटुंबासाठी Chandrapur Warkari Compensation (चंद्रपूर वारकरी मदत) अंतर्गत ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. चंद्रपूर येथील कै. आकाश कोंडलवार यांच्या वारसांना ही मदत ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-2025’ अंतर्गत मिळणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.  (ताडोबा बफरमधील हल्लेखोर वाघ जेरबंद)

 पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघाती मृत्यू झालेल्या चंद्रपूर येथील वारकरी कै. आकाश कृष्णा कोंडलवार (रा. गोपालपुरी, चंद्रपूर) यांच्या वारसांना ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-2025’ अंतर्गत ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा निर्णय आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शक्य झाल्याने त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. शासनाने ३ जुलै २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.

Chandrapur Warkari Compensation अंतर्गत ४ लाख मंजूर

  पंढरपूर वारीदरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी महसूल विभागाकडे पाठपुरावा केला होता. वारकरी कुटुंबावर ओढवलेल्या संकटाची दखल घेत त्यांनी शासन स्तरावर हा विषय प्रभावीपणे मांडला. त्यानंतर शासनाने विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-2025 अंतर्गत कोंडलवार कुटुंबाला ४ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे.

  या निर्णयामुळे मृत वारकर्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळणार असून, आमदार किशोर जोरगेवार यांच्या संवेदनशील भूमिकेचे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे पिढीत कुटुंबीयांनी स्वागत केले आहे.
   शासन निर्णयानुसार ही रक्कम महसूल व वन विभागामार्फत संबंधित लेखाशीर्षाखाली उपलब्ध निधीतून वितरित करण्यात येणार असून, त्यास आवश्यक प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment