Durgapur Illegal Businesses active in Chandrapur district

दुर्गापूर अवैध धंद्यांचे माहेरघर; कायदा-सुव्यवस्था धोक्यात!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 5, 2026

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर भागात सद्यस्थितीत Durgapur Illegal Businesses (दुर्गापूर अवैध धंदे) मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. मात्र, दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कर्मचाऱ्यामुळे अवैध दारू, सट्टा आणि वाळू माफिया प्रचंड सक्रिय झाले आहेत. (वाद मिटवायला गेलेल्या युवकांवरच हल्ला)

चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षकपदी आयुष नोपानी यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी अवैध धंदे व्यवसायिकांवर कारवाईचा बडगा उभारला, नोपानी यांच्या सतत कारवाई मोहिमेमुळे अनेकांनी आपले व्यवसाय बंद केले. अधिकारी चांगला असल्यावर कायदा व सुव्यवस्था कशी असते हे नोपानी यांच्या काही दिवसांच्या कार्यकाळात जनतेला दिसले. मात्र यामध्ये काही अपवाद आहे, चंद्रपुरातील दुर्गपुरात मात्र अवैध धंदे अजूनही जोमात सुरु आहे.

Durgapur Illegal Businesses ला पुन्हा आले सुगीचे दिवस

काही महिन्यापूर्वी दुर्गापूरात परिविक्षाधीन आयपीएस गौरव कायंदे पाटील यांनी प्रभार घेतल्यावर अवैध धंदे पूर्णतः मोडकळीस आणले, मात्र त्यांचा काही महिन्याचा कार्यकाळ संपला आणि दुसरे अधिकारी दुर्गापूर पोलीस ठाण्यात रुजू झाले. आजच्या घडीला दुर्गापूरात अवैध दारू, सट्टा, वाळू माफिया असे अनेक धंदे सक्रिय झाले आहे. हे सर्व सेट करण्यासाठी संदीप नावाचा एक कर्मचारी पुढाकार घेत आहे.

धंद्याची परवानगी ते वसुली सर्व संदीप नावाचा कर्मचारी सांभाळत असून तो हे सर्व अधिकाऱ्यांना अंधारात ठेवत करीत आहे, दुर्गापूर हे अवैध धंद्याचं माहेरघर झालं आहे, याठिकाणी मोठे उद्योग आहे, दारू चे अनेक धंदे आहे, वेळेपूर्वी दारू दुकान सुरु करायचे असेल तर त्याला संदीप ची परवानगी हि आवश्यक असते. मग दुकान वेळेपूर्वी सुरु व वेळेनंतर बंद केल्या जाते.

अश्या कर्मचारी वृत्तीमुळे आज दुर्गापूरात अवैध धंदे फुलू लागले आहे, यामुळे कायदा व सुव्यवस्था अनियंत्रित होण्याचा धोका वाढला आहे. वेळेपूर्वी हे नियंत्रित झाले नाही तर येणाऱ्या काळात दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढणार. त्यामुळे संदीप च्या आधी मुसक्या आवळणे आता गरजेचे आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment