चंद्रपूर प्रियदर्शिनी सभागृहाजवळील फुटपाथवर सुरू असलेला सट्टा पट्टी जुगार

चंद्रपुरात खुलेआम सट्टा पट्टीचा जुगार; पोलिसांची डोळेझाक की संरक्षण?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 7, 2026

चंद्रपूर – चंद्रपूर सट्टा पट्टी जुगाराला नेमके कुणाचे संरक्षण आहे? शहराच्या मध्यवर्ती भागात, प्रियदर्शिनी सभागृहाजवळील फुटपाथवर हा जुगार रोज उघडपणे सुरू असतो. (सासुरवाडीत जावयाचे डोके फोडले, वाचा ही बातमी)

सकाळी ९ वाजल्यापासून ओपन आणि क्लोज आकड्यांची माहिती घेण्यासाठी सट्टा बहाद्दर येथे जमतात. तरीही स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेची नजर या ठिकाणी का पडत नाही, हा प्रश्न कायम आहे.

अश्या अवैध धंद्यावर स्थानिक पोलीस स्टेशन व गुन्हे शोध पथक व जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा कारवाई करीत असते मात्र अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या सट्टा जुगारावर पोलिसांची नजर न पडणे हे आश्चर्यकारक आहे.

वर्दळीच्या ठिकाणी सट्टा पट्टीचा अड्डा

चंद्रपूर प्रियदर्शिनी सभागृहाच्या बाजूला ऑटो स्टॅण्ड व खासगी व शासकीय बस थांब्याच्या ठिकाणी असलेल्या फुटपाथवर सकाळी 9 वाजता पासून ओपन व क्लोज आकड्यांची माहिती जाणून घेण्यासाठी सट्टा बहाद्दरांची या ठिकाणी चांगलीच गर्दी जमते.


विशेष म्हणजे हा सट्टा इतर धंद्यासारखा नाही कारण या ठिकाणी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून अधिकृतपणे सट्टा आकड्याची पावती दिल्या जाते आपण ज्या आकड्यावर पैसे लावले त्याचा.
पैसे लावल्यावर प्रामाणिकपणे दुसऱ्या दिवशी पैश्याची देवाणघेवाण होते.


मात्र बेकायदेशीर असलेल्या या सट्टा व्यवसाय शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी सुरू कसा आहे, या धंद्याला कुणाचे संरक्षण आहे? जिल्ह्याला चांगले पोलीस अधीक्षक लाभले असताना कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचे काम कोण करीत आहे? यावर पोलीस विभागाने गंभीरपणे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment